चर्चा:पांढरा हत्ती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय होतू:,

या वाहनाबद्दल काही माहिती आहे का?

अभय नातू (चर्चा) ०७:२७, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]

नाही. पण पांढरा हत्ती बाळ्गणे अशी म्हण आहे.--. Sachinvenga चर्चा . : ०८:०१, १२ जानेवारी २०१८ (IST)[reply]


@अभय नातू:,
हे वाहन नाही. एखादी वस्तू / वास्तू वापराविना पडून असल्यास किंवा त्याचा निर्मिती खर्च वसूल न होता त्यातून आर्थिक तोटा होत असेल तर अशा किंवा तत्सम परिस्थितीतील वस्तू / वास्तू यास पांढरा हत्ती म्हणतात असे मी ऐकले आहे.--अभय होतू (चर्चा) २१:५६, १७ जानेवारी २०१८ (IST)[reply]
ठीक. मला वाटले पिवळा हत्ती सारखा पांढरा हत्तीही आहे कि काय.
अभय नातू (चर्चा) ०६:४२, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]
पिवळ्या हत्तीसही पांढरा हत्तीच म्हणतात काही ठिकाणी.(अज्ञानवश). छोटा हत्ती कोण्या एका मालवाहनास म्हणतात कारण त्याची वजन वाहण्याची क्षमता बरीच असते.'पांढरा हत्ती पोसणे' (त्याचे पालन करणे) म्हणजे तोट्याचा व्यवहार अथवा क्रिया.फक्त प्रदर्शनाचा मामला.चारा पाण्याचा इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत जास्त खर्च. त्यापासून फायदा काहीच नाही,त्यास पाहण्यास होत असलेल्या गर्दीमुळे मनस्तापच जास्त.गर्दीने काहीबाही करू नये म्हणून सतत देखरेख आवश्यक.(जून्या काळातील)गर्दी काही पैसे देत नाही.तो अंगणात बांधलेला असल्यामुळे व घरात नेता येत नसल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी त्यास लपवू शकत नाही.येणारे जाणारे कुतुहलापोटी थांबून बघत असतात.पालनपोषणाचा खर्च विनाकारणच ऊरावर बसतो.एखाद्या पदास अथवा व्यक्तिसही उपरोधिक म्हणून ही संज्ञा/वाक्प्रचार वापरतात.त्याचेपासून फायदा/उत्पादन/काम काहीच निघत नसेल.तो पद अडवून बसला असेल, विनाकारण एखादे पद मिरवित असेल व फुकटचा खर्च करीत असेल व चालू कामात विनाकारण अडथळे/खोडा उत्पन्न करीत असेल तर.--वि. नरसीकर , (चर्चा) ०७:०५, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]

ता.क.:आजकाल अनेक घरातील वृद्ध व्यक्तीही कौटुंबिक व सामाजिक स्तरावर एक 'पांढरा हत्ती'च ठरत आहेत, असे काही तरुणांचे मत पडते.ते वृद्धावस्थेमुळे घरातील जास्त काम करू शकत नाहीत. घरात त्यांचा कामासाठी काहीच उपयोग होत नाही. फक्त (आधीच लहान असलेल्या घरात/फ्लॅटमध्ये) जागा अडविणे. सतत औषधोपचाराचा खर्च,डॉक्टरच्या वाऱ्या,त्यापोटी घ्याव्या लागण्यात येणाऱ्या सुट्या आदी गोष्टींमुळे ते 'पांढरा हत्ती' ठरतात.जून्या विचारांमुळे आधुनिकतेशी सांगड घालता येत नाही व विनाकारण उपदेश करतात. --वि. नरसीकर , (चर्चा) ०७:१५, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]

विषयांतर. न वापरली जाणारी वस्तू या अर्थाने पांढरा हत्तीची व्याख्या थोडी वेगळी आहे. त्यात फक्त बिनउपयोगी असा अर्थ अपेक्षित नसून उपयोग नसणारी, प्रचंड पैसा खर्च करुन विकत घेतलेली, प्रचंड पैसा खर्च करून बाळगलेली आणि महत्वाचे म्हणजे आपला डौल दाखविण्यासाठी बाळगलेली वस्तू असा आहे.
अभय नातू (चर्चा) २१:१२, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]