कुक्कुट पालन
कुक्कुट पालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.
पद्धती
[संपादन]कुक्कुट पालनाच्या सध्या तीन पद्धती प्रचलीत आहेत:
- अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
- अर्ध-नियंत्रित पद्धती
- नियंत्रित पद्धती
अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
[संपादन]सहसा कमी प्रमाणातील कुक्कुटपालन अथवा परसदारी करण्यात येणारे कुक्कुटपालन या पद्धतीने केले जाते. यास अत्यल्प खर्च येतो पण याचे फायदे-तोटेही आहेत.
फायदे
[संपादन]यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.
परसातील कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेकरीता उत्तम पर्याय आहे. ह्यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो.
तोटे
[संपादन]घार, मुंगूस, कुत्रा, मांजर आदी प्राणी कोंबड्यांची शिकार करतात त्यामुळे व चोरीमुळे आर्थिक नुकसान होते
फायटर
[संपादन]गुजरात आणि महाराष्ट्र येथे प्रामुख्याने बुसरा जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात.
भारतात कोंबडी (कुक्कुट) संशोधनात कार्यरत संस्थांनी बहुपयोगी अशा कोंबड्यांच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत.
- गिरिराज, ग्रामप्रिया - अंडीउत्पादनासाठी - प्रकल्प संचालनालय, हैदराबाद
- कृषिब्रो, गिरिराज - मांस उत्पादनासाठी
- वनराज - मांस, तसेच अंडी उत्पादनाकरिता
वनराज कोंबड्या एका वर्षात साधारणपणे १४० ते १५० अंडी देतात. गिरिराज कोंबड्या वर्षाला १८० अंडी देतात.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- सरकारच्या संकेतस्थळावर असलेली माहिती[permanent dead link]
- कुक्कुटपालन, कोंबडी पालन, कोंबडयांची काळजी याची माहिती[permanent dead link]
- परसबागेतील कडकनाथ या जातीचे कोंबडी पालन[permanent dead link]
- कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे, तांत्रिक मार्गदर्शन कोठे मिळेल?[permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |