साचा चर्चा:पुणे-दौंड-बारामती रेल्वेमार्ग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सुशान्त देवळेकर:

सदर साच्यात लेखकाकडून राहिलेल्या त्रुटी:

१. "मालाड गाव रेल्वे स्थानक"....हे नाव चुकीचे आहे. स्थानकाचे नाव "मालाड गाव" नसून "मळदगांव" असे आहे.

२. घोरपडी हे चुकीचे असून "घोरपड़ी (ट्रांशिप) यार्ड" हे योग्य नाव आहे.

३. घोरपडी या स्थानकाला चुकीच्या स्थानकाचा दुवा जोडलेला आहे.

४. दौंड हे हिंदी नाव असून ते मराठीमध्ये दौण्ड असे योग्य आहे.

५. "मालाड गाव रेल्वे स्थानक"....हे नाव चुकीचे आहे. स्थानकाचे नाव "मालाड गाव" नसून "मळदगांव" असे आहे.

६. शिरसई चुकीचे आहे. शिरसाई असे योग्य नाव आहे.

७. "दौंड मालधक्का" याला चुकीचा दुवा जोडला आहे.

८. साच्याच्या नावात "दौंड-बारामती" असा उल्लेख आहे... त्याऐवजी "पुणे-दौण्ड-बारामती" असा उल्लेख संयुक्तिक वाटतो का?

९. साच्याच्या नावात "पुणे उपनगरी रेल्वे" हे चुकीचे आहे. "पुणे-दौण्ड-बारामती" या मार्गाला रेल्वे प्रशासनाकडून तसा अधिकृत दर्जा अद्याप प्राप्त झालेला नाही.

--अभय होतू (चर्चा) ०२:०८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

@अभय होतू:
१, २, ३, ४, ५, ६, ९ यांच्याबद्दल पुणे उपनगरी रेल्वेच्या चर्चा पानावर लिहिले आहेच.
७. दुवा कोठे असावा? वेगळा लेख लिहावा का?
८. दौंड-बारामती ही ब्रांच लाइन आहे. पुणे-दौंड हा मार्ग मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गाचा भाग आहे. असे असल्याने दौंड-बारामती हेच योग्य वाटते.
अभय नातू (चर्चा) ०७:१०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]