टिम अॅलन
Appearance
टिमोथी ॲलन डिक तथा टिम ॲलन (१३ जून, १९५३:डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आणि लेखक आहे. याने टॉय स्टोरी चित्रपटशृंखलेत बझ लाइटइयरला आवाज दिलेला आहे. याशिवाय ॲलनने सांता क्लॉझ चित्रपटशृंखलेसह ३०पेक्षा जास्त चित्रपटांतून कामे केली.
ॲलनने होम इंप्रूव्हमेंट या दूरचित्रवाणी मालिकेत टिम द टूलमॅन टेलर आणि लास्ट मॅन स्टॅंडिंग या मालिकेत माइक बॅक्सटरच्या मध्यवर्ती भूमिका केल्या.
ॲलनला गोल्डन ग्लोब आणि एमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.