Jump to content

चर्चा:भारतीय संस्कृती कोश

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@आर्या जोशी:

आपल्याला कदाचित या लेखाचासुद्धा विस्तार करणे आवडेल तर पहावे शिवाय इतर लेखात या ग्रंथ मालिकेचे संदर्भ नमुद करताना या लेखाचा दुवाही अंतर्भूत करता येईल म्हणून आपले लक्ष वेधले.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५५, १५ जून २०१७ (IST)[reply]

@Mahitgar आणि माहितगार:धन्यवाद. लेख सुरु केला आहे. आर्या जोशी (चर्चा)


धन्यवाद, या लेखाचा रोख या विशीष्ट कोशा बद्दल असावा असे वाटते कदाचित लेखन करुन मग संपादन करुन बदल होईल, तुर्तास संस्कृती आणि नंतरचा विभाग भारतीय संस्कृती हे परिच्छेद कदाचित संस्कृती आणि भारतीय संस्कृती लेखास अधिक योग्य वाटतात. एक वाचक म्हणुन कोशाच्या दहा खंडातून नेमके कोणते विषय कव्हर केले आहेत, मांडणी पद्धती, कोश निर्मिती मंडळ त्याचे संपादक लेखक लेखन आणि प्रकाशन कालावधी, या बद्दल या लेखात अधिक वाचावयस आवडेल.


महाराष्ट्र शासनाचा ज्ञानकोश आकारास येत असतानाच्या काळात ह्या कोशाची माहिती त्यात घेणे शक्य असताना, समांतर भारतीय संस्कृती कोशाची वेगळी निर्मिती का होती हे सहज जिज्ञासा म्हणून कुतूहल वाटले. असो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५४, १६ जून २०१७ (IST)[reply]

@Mahitgar आणि माहितगार: आज ते विषय लेखात घालते आहे.धन्यवाद. आर्या जोशी (चर्चा) @Mahitgar आणि माहितगार: सत्यनारायण पूजा या बदलासाठी धन्यवाद .आर्या जोशी (चर्चा)

सत्यनारायण व्रतातील शक्य जाती निरपेक्षता लक्षात घेऊन बंगाल का महराष्ट्रातील एका पुरोगामी चळवळीने ती प्रोमोट केल्याचेही कुठेतरी वाचनात आले होते. तो संदर्भ आता शोधला असता मिळाला नाही. पुन्हा कधी मिळाल्यास देईन.
बांग्लापिडीया (बांग्लादेश सरकारचा विश्वकोश) मधील सत्यपीर विषयक एक नोंद दुवा
'नारायण' या शब्दाची केतकरांच्या ज्ञानकोशातील नोंद मराठी विकिपीडियावर आणण्यास हरकत नसावी. आणि त्याचा अल्प उल्लेख या लेखात करता येईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४०, १७ जुलै २०१७ (IST)[reply]

नामनिर्देशन भारतीय संस्कृती कोष असे करावे Ravikiran jadhav (चर्चा) २१:४६, ८ जून २०२२ (IST)[reply]