थिएटर फ्लेमिंगो
Appearance
थिएटर फ्लेमिंगो हा महाराष्ट्रातील गावांमधून मराठी नाटक नेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला पुण्याच्या तरुणांचा एक उपक्रम आहे.
सहसा मराठी नाटके मुंबई-पुणे या शहरांबाहेर फारशी दिसत नाहीत. हे बदलण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला.
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाटकाचे शिक्षण घेतलेल्या नऊ विद्यार्थ्यांनी ही नाट्यप्रयोग संस्था स्थापन केली. नाटकाशी संबंधित सर्व कामे तेच करतात. ते काही ठिकाणी तीन तासांचे नाटक, तर काही ठिकाणी एकपात्री सादर करतात. ही यात्रा पुण्यात तसेच सिंधुदुर्ग, कणकवली, इचलकरंजी, कोल्हापूर, गोवा अशा निरनिराळ्या भागांत प्रयोग करते.