चर्चा:भारतीय जनगणना, २०११

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साक्षरता[संपादन]

साक्षरता आकड्यांमध्ये सुसंगतता वाटत नाही आहे. उदा. १९०१मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे २४ कोटी होती. त्यांतील ५० टक्के स्त्रीया धरल्या तर १२ कोटी स्त्रीया असणार. त्यांतील फक्त ०.६ टक्के साक्षर होत्या असे मानले तर संपूर्ण भारतात (अखंड भारत गृहित धरले आहे) फक्त सात-सव्वा सात लाख स्त्रीयांना लिहिता-वाचता येत होते?! साक्षरता ही संकल्पना कदाचित ब्रिटिश धोरणांनुसार असणार.

या आकड्यांसाठीचा विवक्षित संदर्भ मिळाला तर उत्तम.

अभय नातू (चर्चा) ०९:५४, ५ मे २०१७ (IST)[reply]

अंक बदल[संपादन]

@प्रसाद साळवे: सर, या लेखात अनेक ठिकाणी इंग्रजी अंकाचे मराठी भाषांतराची आवश्यकता आहे, कृपया मदत करा. व संदर्भातील इंग्रजी अंक बदलणार नाही याची काळजी घ्या. --संदेश हिवाळेचर्चा १८:४५, १९ मे २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १८:४५, १९ मे २०१७ (IST)[reply]

१९५१ मध्ये बौद्ध लोकसंख्या[संपादन]

इ.स. १९५१ मध्ये भारतात बौद्ध लोकसंख्या ही केवळ १,८०,८२३ होती. बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर १९६१ मध्ये बौद्ध संख्या ३२,५०,२२७ (१९५१ सालच्या संख्येच्या १६७१% वाढलेली) होती. १९६१ मध्ये भारतात ०.७% बौद्ध होते त्याआधी मात्र ०.०७% पेक्षा कमी बौद्ध भारतात होते, परंतु १९५१ मध्ये ही ०.७४ बौद्ध लोकसंख्या येथे दाखवण्यात आली. --संदेश हिवाळेचर्चा १५:३३, २० मे २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:३३, २० मे २०१७ (IST)[reply]