Jump to content

पिवळा धोबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करड्या डोक्याचा धोबी
Cuculus canorus canorus + Motacilla flava

पिवळा धोबी(इंग्रजी: Western yellow wagtail, हिंदी: पिलक्या, पिली खंजन) हा एक पक्षी आहे.

पिवळ्या धोब्याच्या काही उपप्रजाती आहेत.

  • करड्या डोक्याचा धोबी किंवा भाटुकली (इंग्लिश:Dark-headed Wagtail or Grey-headed Wagtail; हिंदी:नील-सिर पीलाकिया) ही पिवळ्या धोब्याची एक उपप्रजात आहे.
पिवळा धोबी हा आकाराने चिमणीएवढाच असतो. वरील भागाचा रंग हिरवा असून शेपटीची किनार पाढरी असते. खालील भागाचा वर्ण पिवळा असतो. डोक्याचा रंग करडा अथवा थोडासा निळसर :असतो व भुवईचा रंग पांढरा असतो. पिवळा धोबी पाकिस्तान आणि भारतात गंगेचे मैदान ते दक्षिणेकडे कच्छ्, कन्याकुमारी, श्रीलंका आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश व :अंदमान आणि निकोबार बेटे या भागात आढळून येतो.
  • निळ्या डोक्याचा धोबी किंवा चिमण गांगेडा (इंग्लिश:Blue-headed Wagtail; हिंदी:नील-सिर पीलाकिया) ही पिवळ्या धोब्याची एक उपप्रजात आहे.
निळ्या डोक्याचा धोबी
या पक्ष्याचे डोके निळसर राखी रंगाचे असते. त्याची भुवई ठळक पांढरी रंगाची असते. तो पाकिस्तान,पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश आणि नेपाळचे खोरे या ठिकाणी आढळतो. तसेच भारतात गंगेच्या मैदानापासून दक्षिणेकडे :केरळ आणि श्रीलंका, निकोबार व मालदीव बेटे या भागात ते हिवाळी पाहुणे म्हणून येतात. हा धोबी दलदली, भातशेतीचा प्रदेश, तसेच विरळ शेतीचा प्रदेश, खाजनी आणि देवनळाची बेटे या ठिकाणी आढळतो.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली