चर्चा:चेंबुर रेल्वे स्थानक
@Yogeshs:, चेंबूर रेल्वे स्थानक हा लेख आधीच आहे. कोणता ठेवावा? तो अभय नातू (चर्चा) २३:०१, २१ मार्च २०१७ (IST)
@ अभय नातू आधीचा लेख चेंबूर रेल्वे स्थानक आहे. स्थानक फलकावर चेंबुर असा उल्लेख असल्याने चेंबुर रेल्वे स्थानक हा लेख आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील कित्येक रेल्वे स्थानकांची नावे आणि त्या त्या गावांची/ठिकाणांची नावे यात फरक आढळतो. यावरुन इतर एका रेल्वेविषयक सोशल नेटवकिंग साइटवर देखील मी बरेच वाद्विवाद पाहिले आहेत. अंतिमता: असा निष्कर्ष निघतो की हा घोळ आणि पुढे निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी सोयीचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे:
रेल्वे स्थानकाचे नाव ज्याप्रमाणे स्थानकावर आहे त्याप्रमाणेच लिहायचे आणि जर काही घोळ असेल तर 'स्थानिक नाव' लिहायचे. विकिपिडीयावर देखील "माहितीचौकट रेल्वे स्थानक" येथे 'स्थानिक नाव' हा पर्याय उपलब्ध आहे.
रेल्वे फलकावरील नावात शंका असल्यास 'स्थानिक नाव' लिहिता येईल.
उदा. "जर" चेंबूर हे नाव बरोबर असेल तर > ....
स्थानकाचे नाव: चेंबुर
स्थानिक नाव : चेंबूर
अशा पद्धतीने माहिती अपभारित केल्यास सोयीचे राहील अन्यथा हा वाद निरंतर असाच चालू राहील. Yogeshs (चर्चा) २३:२२, २१ मार्च २०१७ (IST)
- म्हणजे याचा अर्थ असा होतो का की रेल्वेमधील ज्या कोणी चेंबुर रेल्वे स्थानक हे नाव ठरवले, त्यांनी स्थानिक नावाची शहानिशा न करता आपल्याला सुचले, जमले ते नाव ठोकून दिले?
- अभय नातू (चर्चा) ०८:२८, २४ मार्च २०१७ (IST)