चर्चा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स
Appearance
‘२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स’ ही शब्दरचना मराठी आहे? १८३५ जन्म घेतलेले साईबाबा, किंवा २०१६ धरणांतील पाण्याची स्थिती या शब्दसमूहांना जसा इच्छित अर्थ नाही तसाच ‘२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स’लाही नाही. मी नामांतर केले होते, पण कुणीतरी ते गुपचूप बदलून पूर्वपदाला नेले. ... ज (चर्चा) १५:४३, ७ सप्टेंबर २०१६ (IST)
- ही शब्दरचना मराठी आहे/नाही हा वादाचा विषय आहे परंतु आतापर्यंतचे अनेक लेख या प्रकारी लिहिले गेलेले आहेत तरी असे अचानक एका लेखाचे नामांतर करू नये.
- उलटसुलट चर्चा होउन कोणती शब्दरचना ग्राह्य आहे हे ठरल्यावर एकगठ्ठा बदल करता येतील. नाहीतर अनागोंदी (आहे त्यापेक्षा अधिक) माजेल.
- अभय नातू (चर्चा) २३:०५, ७ सप्टेंबर २०१६ (IST)