चर्चा:हिंमतलाल मगनलाल शाह
विकिपीडिया ते विकिपीडिया संदर्भ
[संपादन]@श्रीनिवास हेमाडे: मराठी विकिपीडियाच्याच एका लेखाचा दुसऱ्या मराठी विकिपीडिया लेखात संदर्भ देणे टाळावे असा सर्वसाधारण संकेत असतो. अर्थात उद्देश लेखनाचे श्रेय दुसऱ्या विकिपीडीयन अथवा लेखाचे श्रेय नमुद करणे असेल तर हरकत नसावी, श्रेय आढाव्यात सुद्धा नमुद करता येते, (उदा. :अलिकडे सत्य-सुवर्णपात्र - संस्कृत सुभाषिताचा अनुवाद मराठी विकिक्वोट मध्ये मी q:सत्य नावाच्या लेखात कॉपीपेस्ट करताना लेखाच्या आढाव्यात तुमच्या मराठी विकिपीडियावरील सुभाषित अनुवाद संपादनाचा संदर्भ नमुद केला) याच प्रमाणे इंग्रजी विकिपीडियातून लेखन अनुवाद करुन घेतला तर तशा लेखाचे श्रेय नमूद करावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४९, १२ जानेवारी २०१६ (IST)
हा संकेत मला माहित नव्हता, म्हणजे मी जरा साशंक होतो.
मी सध्या एक वेगळा लेख लिहितो आहे एका नियतकालिकासाठी. त्यात Self Plagiarism चा संदर्भ आहे, तसे माझ्याकडून घडू नये, या हेतूने मी हा संदर्भ दिला होता.
श्रेय आढाव्यात नमूद करता येईल की नाही, हेही माहित नव्हते. तशी वेळ प्रस्तुत लेखापर्यंत आली नसल्याने तेही समजले नव्हते.
यापुढे हा संकेत मी पाळेन.
दुसरे असे श्रीमंत प्रतापशेठ या लेखात प्रतापशेठ यांचे छायाचित समाविष्ट करावे, असे वाटते. पण ते मिळणे कठीण आहे. मी ८,९ जानेवारीला अमळनेरला होतो. तेथे त्यांची पोस्टर्स, फलक सार्वजनिक आहेत. काही ठिकाणची छायाचित्रे मी आणली आहेत. त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या पुतळ्याची छायाचित्रे ही आणली आहेत. ती कशी वापरावीत ? की पुन्हा पुतळ्याचा प्रताधिकार इत्यादी प्रश्न येतील?
हीच बाब संगमनेर महाविद्यालय व शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष इत्यादी बाबत. त्यांचेही फोटो उपलब्ध नाहीत, नियतकालिकात किंवा स्मृतीग्रंथात छापलेली आहेत, पण संपादक , छायाचित्रकार दिवंगत आहेत. आज मला शक्यतो शंकरराव गंगाधर जोशी, हिंमतलाल मगनलाल शाह यांच्या संचिका चढवायची इच्छा आहे. पण ती छापील आहेत, तिचे छायचित्र घेऊन ते करावे किंवा कसे ? !
एकुणातच अशा स्थितीत काय करावे ?
कृपया, कळवावे.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे ०८:४८, १३ जानेवारी २०१६ (IST)
सेल्फ प्लॅगरीझम बाबत
[संपादन]- १) विकिपीडियावरील (लिखीत) मजकूर सहसा मुक्त सांस्कृतिक काम व्याख्येस अनुसरुन आणि CC BY-SA 3.0 परवान्यांतर्गत पुर्नवापरासाठी मुक्त होत असतो केवळ श्रेय नमूद करणे अभिप्रेत असते. - आढाव्यात श्रेय नमूद केले तर Self Plagiarism चा मुद्दा सुद्धा -जर काही असेल तर- सुटावा असे वाटते तरीही मी आपला मुद्दा पुन्हा एकदा अभ्यासेन.
- एखादे प्रकाशन लेखकास लेखनाचा भत्ता/पगार देऊन अथवा व्यक्तीच्या नौकरीचा भाग म्हणून लेखन करवून घेत असेल तर प्रताधिकार प्रकाशकाकडे स्थानांतरीत होतो, परंतु या स्थितीत प्रकाशक अथवा संबंधीत आस्थापनेने लेखकाशी तसा विशीष्ट करार करून घेणे अथवा अपॉइंटमेट लेटर मध्ये करार स्वरूप अटी नमुद करून घेऊन प्रताधिकार स्वत: कडे घेणे अभिप्रेत असते. एक उदाहरण शिक्षक/प्राध्यापक जेव्हा कार्यरत असलेल्या शाळा/कॉलेज करता प्रश्नपत्रिका काढतील तेव्हा सहसा प्रताधिकार शाळा कॉलेज कडे जाईल. एसएससी बोर्ड किंवा इतर परिक्षा संस्था जेव्हा प्रश्न पत्रिका बनवून घेतील तेव्हा वस्तुत: त्यांनी त्यांच्या कार्यपत्रात कॉपीराईट त्यांच्या कडे स्थानांतरीत होतो आहे हे नमुद करणे अभिप्रेत असावे. असा जो विकलेला अथवा स्थानांतरीत प्रताधिकार आहे ते लेखन आपले असले तरीही प्रताधिकार आपला राहात नाही म्हणुन सेल्फ प्लॅगरीझम ही संकल्पना असावी ( माझा अद्याप या वर विशेष अभ्यास नाही चुकलो असेन तर अवश्य दुरुस्त सांगावे)
- सेल्फ प्ल्गरीझम सदृश्य उदाहरण वाचनात आले ते म्हणजे दिल्लीच्या एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लावलेली खासगी प्रकाशनांची काही पुस्तके दिल्लीच्या त्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी लिहिलेली होती, पण प्रकाशकांशी लेखी करारत बहुधा प्रताधिकार मालकी प्रकाशकांकडे स्थानांतरीत केलेली असावी. (बऱ्याच लेखकांना प्रकाशकाने करारात काय लिहुन घेतले हे माहित नसते/लक्ष नसते) -अशा मालकी स्थानांतरीत झालेल्या स्थितीतही प्रताधिकार सर्वसाधारणपणे लेखकाचे आयुष्य + ६० वर्षे मोजला जातो- या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांच्या किमती खूप जास्त असल्यामुळे विद्यार्थीवर्ग ती पुस्तके विद्यापीठ आवारातील खासगी झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स करून घेऊ लागले त्यावर प्रकाशकांनी न्यायालयातून स्टे आणला -विद्यार्थ्यांनी आंदोलन केले लेखक-प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तात्वीक पाठींबा दिला पण इफेक्टीव्हली ते सेल्फ प्लॅगरीझमचे समर्थन होत असावे असे वाटते -भावनीक दृष्ट्या विद्यार्थी आणि लेखक-प्राध्यापक मंडळींना काहीही वाटत असले तरीही कायदेशीर दृष्टीने प्रकाशकांची बाजू बहुधा त्या वेळी बरोबर असावी. (चुभूदेघे) [या संदर्भाने आता कायदा काहीसा बदललेला असावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिक्षक-प्राध्यापक त्यांच्या शाळा-कॉल्जच्या वर्गात ज्या नोट्स वाटतात त्यास कायद्यातून आता अधिक मोकळीक असावी.] कायद्याच्या संबंधीत कलमांना वाचून घेणे उपयूक्त असावे. (विकिपीडियाचा उपयोग शैक्षणिक असला तरीही शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादीतही नाही म्हणून विकिपीडियास कायद्यातील त्या सवलतींचा लाभ घेणे अवघड जाते) असो.
- अर्वरीत मुद्द्यांचे उत्तर खालील वेगळ्या उपविभागातून देतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४०, १३ जानेवारी २०१६ (IST)
पुतळ्यांचे छायाचित्र
[संपादन]पुतळ्यांवर कॉपीराइट असू शकतो परंतु रास्त उपयोग तत्वात सार्वजनिक ॲक्सेस असलेल्या ठिकाणी सार्वजनिक दृष्यमान पुतळ्यांच्या/कलाकृतींच्या छायाचित्रणास अपवाद लागू होऊन अशी छायाचित्रे चढवता यावीत.
बारकावा निट लक्षात घेतला तर हाच नियम सार्वजनिक ठिकाणच्या कायमस्वरुपी प्रदर्शीत पोस्टर्स आणि जाहीरातींनाही लागू व्हावा; महत्वाचा बारकावा हा कि ते सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरुपी प्रदर्शीत होत आहे असे छायाचित्रातून निदर्शनास यावयास हवे. -काही सरकारी बिल्डींगांवर काही सरकारी जाहीराती/पोस्टर कायमस्वरुपी दिसतात त्यांना हे लागू व्हावयास हवे (चुभूदेघे)- म्हणजे पोस्टर किंवा जाहीरात जशीच्या तशी प्रिंटेड मटेरीयल स्कॅन करुन अथवा सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरुपी प्रदर्शीत नसल्यास या अपवादाचा वापर करता येणार नाही. (विशीष्ट ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नसल्यास जाहीरातींना विकिपीडिया निकषात स्थान उपलब्ध नसते)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४४, १६ जानेवारी २०१६ (IST)
52- 1) - t Certain acts not to be infringement of copyright- --The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,-.....(t) the making or publishing of a painting, drawing, engraving or photograph of sculpture, or other artistic work falling under sub-clause (iii) of clause (c) of section 2, if such work is permanently situate in a public place or any premises to which the public has access;
संदर्भ s:en:Indian_Copyright_Law
नियतकालिकात किंवा स्मृतीग्रंथात छापलेली
[संपादन]छायाचित्रकार- संपादक लेखक इत्यादी मंडळी दिवंगत असली तरी प्रताधिकार त्यांच्या कायदेशीर वारसांकडे जातो त्या बाबत कायदेशीर वारसांच्या लिखीत पुर्वपरवानगी परवान्या शिवाय काहिही करता येत नाही.
अशा स्वरुपाच्या कॉपीराइटमुक्त करुन घेण्याच्या कामांमध्ये सातत्य राखण्यासाठी फिल्ड मध्ये प्रताधिकारमुक्ती अभियान चालवणाऱ्या एखाद्या स्वतंत्र चमुची कि ज्याला एखाद्या अस्थापनेचे या कार्यात पाठबळ मिळू शकेल अशी आवश्यकता वाटते. हे मराठीसाठी कधी शक्य होईल ते काळच सांगेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५१, १६ जानेवारी २०१६ (IST)