कट्यार काळजात घुसली (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कट्यार काळजात घुसली
दिग्दर्शन सुबोध भावे
निर्मिती एस्सेल व्हिजन
कथा पुरुषोत्तम दारव्हेकर
प्रमुख कलाकार सचिन पिळगांवकर
सुबोध भावे
अमृता खानविलकर
मृण्मयी देशपांडे
शंकर महादेवन
गीते शंकर महादेवन, राहुल-एहसान-लॉय, महेश काळे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १३ नोव्हेंबर २०१५
अवधी १६२ मिनिटे


कट्यार काळजात घुसली हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे संगीत व वसंतराव देशपांडे ह्यांचा अभिनय असलेले हे नाटक मराठी नाट्यसंगीताच्या सर्वोत्तम नमुन्यांपैकी एक मानले जाते. 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दिवाळीदरम्यान प्रदर्शित झाला.[१]

पंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉंसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन, सुबोध भावेशंकर महादेवन ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे सचिन प्रथमच नकारात्मक भूमिकेमध्ये चमकला. तसेच ह्या चित्रपटामधून गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याने प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.[२]

प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसलीचित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळत असून ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या "इंडियन पॅनोरमा" विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली.[३]

कथा[संपादन]

विश्रामपूर राज्याचे महाराज गायन स्पर्धा आयोजित करतात आणि घोषित करतात की विजेत्याला रॉयल गायकाचा दर्जा देण्यात येईल. त्यानंतर पंडित भानू यांना खानसाहेब आफताब यांनी आव्हान दिले आहे.[४]

पुरस्कार[संपादन]

पुरस्कार वर्ग प्राप्तकर्ता
६३वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महेश काळे

कलाकार[संपादन]

  • सचिन पिळगावकर
  • शंकर महादेवन
  • सुबोध भावे
  • स्वप्निल राजशेखर
  • अमृता खानविलकर
  • मृण्मयी देशपांडे
  • पुष्कर श्रोत्री
  • साक्षी तंवर
  • साहिल कोपर्डे
  • रीमा लागू

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा". Loksatta. 2015-11-03. 2020-08-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Subodh and Mrunmayee in Katyar Kaljat Ghusli - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ "'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा".
  4. ^ "With Sairat, Marathi cinema flies high on box office, appreciation". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-05-23. 2020-08-29 रोजी पाहिले.