मोहिनी कडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. मोहिनी कडू या एक मराठी लेखिका आहेत.

मोहिनी कडू यांनी भारतीय राजकारणातील स्त्रिया यासह अनेक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकात त्यांनी प्राचीन, मध्ययुगीन काळातील, ब्रिटिश काळातील व स्वातंत्र्यसंग्रामाच्या व स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय स्त्रियांच्या कामाची दखल घेतली आहे. यांत रझिया सुलतान, राणी पद्मिनी, चांदबिबी, राणी दुर्गावती, झाशीची राणी, बेगम हसरतमहल अशा अनेक राण्यांचे दाखले दिले आहेत. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांची चरित्रे, आत्मचरित्रे, अनुवादित चरित्रे अशा अनेकांचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. मोहिनी कडू यांनी या पुस्तकात इंदिरा गांधी यांच्या ११ चरित्रग्रंथाचे मूल्यमापन केले आहे.

चरित्रे व अन्य पुस्तके[संपादन]

  • अटलबिहारी वाजपेयी
  • शिवचरित्र (लाखे प्रकाशन)
  • इंदिरा गांधी (लाखे प्रकाशन)
  • पर्यावरण (लाखे प्रकाशन)
  • भारतीय राजकारणातील स्त्रिया (विजय प्रकाशन, नागपूर)
  • महात्मा गांधी (लाखे प्रकाशन)
  • महिलांचे सबलीकरण
  • माहितीसाठी वाचन
  • राजीव गांधी (लाखे प्रकाशन)
  • छत्रपती शाहू महाराज.