Jump to content

बेगम हजरत महल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेगम हसरतमहल या पानावरून पुनर्निर्देशित)
बेगम हजरत महल

बेगम हजरत महल तथा मुहम्मदी खानुम (??: फैजाबाद, भारत - ७ एप्रिल, इ. स. १८७९: काठमांडू, नेपाळ) बेगम हजरत महल ही अवधच्या नवाब वाजीद अलीची पत्नी होती.

फैजाबाद या गावी एका गरिब कुटुंबात जन्म झालेली मुहम्मदी खानुम ही अत्यंत सुंदर होती. नवाब वाजीद अली याने मुहम्मदी खानुमच्या सौंदर्यावर मोहीत होवून तिच्याशी निकाह केला. निकाहानंतर नवाब अली यांनी मुहम्मदी खानुम हिचे नाव बदलून बेगम हजरत महल असे ठेवले.

बेगम हजरत महल अत्यंत स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी होती. नवाब वाजीद अलीचे राज्यकारभारात लक्ष नसल्याने ती राज्यकारभारात लक्ष घालू लागली. १३ फेब्रुवारी १८५६ रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले. नवाब वाजीद अलीला कलकत्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. बेगम हजरत महलने इंग्रजांच्या अरेरावीला विराध करण्याचे ठरवून आपल्या १४ वर्षाच्या मुलासह लखनौमध्येच राहण्याचे ठरविले. बेगम हजरत महल स्त्री असूनही युद्धनिपुण होती. शस्त्रास्त्रे चालविण्यात ती तरबेज होती. तिने महिलांचे सैनिक दल उभारून इंग्रजांच्या सैन्याचा कडवा प्रतिकार केला होता.

अखेर १८ मार्च १८५८ रोजी बेगम हजरत महलचा इंग्रजांनी पराभव केला. त्यानंतर तिने नेपाळमधल्या तराईच्या जंगलात आश्रय घेतला. काही वर्षांनंतर काठमांडूला राहत असतानाच १८७९ मध्ये तिचा मृत्यू झाला.