दालन:इतिहास/दिनविशेष/जानेवारी/३०
Appearance
- १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यू पावला होता.
- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १९११ - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.