विकिपीडिया:आवाहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक आवाहन

मराठी विकिपीडिया अद्याप बाल्यावस्थेत आहे. इंटरनेटच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेल्या माहितीज्ञानाच्या आवाक्याशी ह्या सांकेतिक स्थळाची तुलना करणेदेखील हास्यास्पद ठरेल. परंतु, इंटरनेटद्वारे भारतीय भाषांमध्ये माहितीज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये खचितच हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे.

विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने ह्या प्रयत्नात विविध क्षेत्रांतील जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. आपण ह्या कार्यात काही मदत करू शकाल अशी आम्ही आशा करतो.

आपण मुख्यत्वे पुढील प्रकारे मदत करू शकता:

१. नवीन माहिती, ज्ञानाची भर - कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते माहिती व ज्ञान पुरवणे. अर्थातच हे ज्ञान कोणी जाणकार, तज्ज्ञ व्यक्तिंनी द्यावे लागते. आपणदेखील आपल्या क्षेत्रातील ज्ञान ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

नविन लेखात आपण पुढील बाबी लिहू शकता ( बंधन नाही )
  • लेख ज्याबद्दल आहे त्याचे थोडक्यात वर्णन
  • लेख ज्याबद्दल आहे त्याचा इतिहास
  • लेख ज्याबद्दल आहे त्याचा संदर्भ
  • लेख ज्याबद्दल आहे त्याची सद्यस्थिती\अवस्था
  • लेख ज्याबद्दल आहे त्यास मिळत्या-जुळत्या लेखासाठी दुवा == हेही पहा == या प्रकारे

२. भाषांतर - इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, चिनी तसेच इतर भाषांमधील विविध क्षेत्रांसंबंधी माहिती तुम्ही मराठीमध्ये भाषांतरित करून येथे भर घालू शकता.

३. माहिती तपासणे व चुका दुरुस्त करणे इतर लेखकांनी मांडलेली माहिती तपासणे आणि गरज वाटल्यास त्यातील चुका दुरुस्त करणे.