गोळाभात
Appearance
गोळाभात मुख्यत्वे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
साहित्य
[संपादन]पूर्वतयारी
[संपादन]प्रथम गोळे बनविण्यासाठी चण्याच्या डाळीचा भरडा(जाड दळलेले पिठ) घेउन त्यात हळद,तिखट,मिठ,ओवा,हिंग,धनेकुट,जिरेकुट,तेलाचे मोहन ई.टाकुन त्याला घट्ट भिजवुन त्याचे मुठीमध्ये दाबुन गोळे बनवावे.
कृती
[संपादन]भात शिजविण्यास टाकावा.थोडा शिजल्यावर व पाणी आटल्यावर, त्यावर तयार केलेले गोळे टाकावे व पुन्हा भात शिजु द्यावा.
सजावट
[संपादन]भात वाढल्यावर त्यावर गोळा कुस्करून वाढावा.त्यावर हिंगाची फोडणी वाढुन कालवुन खाल्ल्यास चवदार लागतो.
इतर माहिती
[संपादन]कोणी भात शिजवतांना त्यात थोडी हळद घालतात.त्याने भातास चांगला पिवळा रंग येतो.