Jump to content

चर्चा:दुर्गा भागवत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .



थोडं विषयांतर करतो, माफ करा. पण विकिपिडीया किंवा कोणत्याही ज्ञानकोशाची ही मर्यादा आहे - इथे दुर्गा भागवत नावाच्या व्यक्तिची बायोग्राफी देता येईल, पण त्यांचा प्रखरपणा, त्यांची ज्ञाननिष्ठा आणि धारदारपणा कसा येईल ? हॅट्स ऑफ टू हर !- मनोज १७:२७, १४ जुलै २००८ (UTC)

नमस्कार,
आपण म्हणल्याप्रमाणे ज्ञानकोशात ही माहिती देणे अप्रस्तुत ठरेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा कार्यनिष्ठेबद्दलची माहिती उपलब्ध असल्यास त्याचा दुवा किंवा पुस्तक-माहिती संदर्भ-स्वरुपात देता येते.
अभय नातू १७:३२, १४ जुलै २००८ (UTC)

अविश्वकोशीय मजकूर

[संपादन]

ध्यासवेड्या दुर्गाबाई"

दुर्गा भागवत..एक लेखिका. पण एवढीच त्यांची ओळख नाही.त्यांच्यावर एक चरित्र ग्रंथ लिहीला आहे.. अंजली किर्तने यांनी. त्यात त्यांनी दुर्गाबाईंसाठी काही विशेषणे वापरली आहेत.

शब्दकळावंती..सौंदर्यासक्त..रंगधुंद..नादलुब्धा..सौरभप्रेमी..भाषाभगिनी..रांधणप्रेमी..

अंजली किर्तने यांनी दुर्गाबाईंवर एक लघुपट बनवला..त्यानंतर चरित्र ग्रंथ लिहिला. अनेक वेळा त्या दुर्गाबाईंना भेटल्या..त्यांच्याशी संवाद साधला.त्या म्हणतात..

"दुर्गाबाईंशी सुखसंवाद साधताना त्यांच्या मनाचे रंग आपल्या मनावरही चढतात. त्यांच्या लेखनात, चरित्रात जेवढं बुडावं तेवढा बुडत्याचा पाय खोलात जातो. उत्खनन करता करता गुणरत्नांची खाण सापडते, तसाच धगधगता ज्वालामुखी सापडतो.आणि परत या ज्वालामुखीच्या आगेमागे नीरव,आरस्पानी, चिंतनमग्न सरोवर असतं.त्या सरोवराच्या तळाशी मोत्यांचे शिंपले मुकाट बसलेले असतात."

प्रखर राष्ट्रवादी, सधन कुटुंबात दुर्गाबाईंचा जन्म झाला. एम.ए.झाल्यावर पी.एचडी साठी त्यांनी विषय निवडला.. मध्य भारतातील आदिवासी जमातींची भाषा, रितीरिवाज, सण,श्रद्धा, परंपरा, राहणीमान आणि या सर्वांची हिंदू धर्माशी तुलना.

मध्य प्रदेशातील जंगलात त्यांनी तीन वर्षे वास्तव्य केले. दळणवळणाची फारशी साधने नसताना अतिशय दुर्गम भागात मैलोनमैल फिरत त्यांनी आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास केला.

या काळात त्यांना जंगलात काही खाण्यामुळे विषबाधा झाली आणि त्या अंथरुणाला खिळल्या. जवळजवळ पूर्ण होत आलेला प्रबंध अपुरा राहिला.

विद्यापिठातुन विद्यावेतन घेतले.. प्रवास भत्ता घेतला आणि तरीही नियोजित वेळेत प्रबंध पूर्ण केला नाही म्हणून त्यांच्यावर मार्गदर्शक डॉ.घुर्ये यांनी टिका केली त्यावेळी त्यांच्या मानी वडिलांनी विद्यापीठाकडुन घेतलेली सर्व रक्कम परत केली.

या आजारपणामुळे त्यांच्या अंगात काहीच त्राण राहिले नव्हते. त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

आणि मग त्यांना निसर्गाचे वेड लागले. झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, सुर्य, चंद्र या सर्वांनी त्यांना इतके मोहीत केले की त्या आपले आजारपण विसरल्या. आणि मग निर्माण झाली एक अतुलनीय साहित्यक्रुती.. "ऋतुचक्र".

लेखनाचा व्याप सांभाळत असताना त्यांनी भरतकाम, शिवणकाम, पाकशास्त्र यांचाही सखोल अभ्यास केला.

विचार स्वातंत्र्याबद्दल दुर्गाबाई म्हणतात..

"लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला पटलं म्हणून आपल्या आवडीचं काम करावं.अशांना कोणी अडवु शकत नाही. अशोक शहाणे, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांना मी उत्तेजन दिलं.कारण माझ्यासारखंच तेही प्रस्थापितांच्या विरोधात काहीतरी करु पहात होते. पण काही काळानंतर ते बदलले. स्वतःला 'प्रस्थापित विरोधी' म्हणवून घेऊ लागले. एक एक करीत सगळ्या बदलले. त्यांना वाटतं.. त्यांची जी कल्पना आहे, जे विचार आहेत तेच सगळ्यांनी उचलले पाहिजेत. विरोध त्यांना चालत नाही. मला वाटतं की प्रत्येकाला आपापले विचार असण्याचा, ते मांडण्याचाही अधिकार आहे."

त्याकाळात दुर्गाबाईंनी या लेखकांना दिलेल्या उत्तेजनामुळे त्यांची प्रतिमा काहिशी दलितप्रेमी झाली होती. एकदा त्यांना विद्याधर पुंडलिक म्हणालेही..

"तुम्ही 'त्यांच्यातल्या' का?"

त्याला उत्तर म्हणून दुर्गाबाईंनी एक लेख लिहिला. त्यात यामध्ये गुंतलेल्या सगळ्यांच्या लिख णाचा आढावा घेतला. आणि मग निष्कर्ष काढला की..

हे लोक बर्यापैकी कविता लिहीतात. पण त्यांच्यात sustained thinking नाही. यामधून काय दिसतं की..यानं त्याला चढवायचं,त्यानं याला चढवायचं.म्हणजे ही या लोकांची गटबाजीच झाली. प्रस्थापितांना.. म्हणजेच व्यवस्थित संघटीत झालेल्यांना, त्यांच्या सत्तेला विरोध करताना तुम्ही स्वतःदेखील तसेच व्यवस्थित संघटीत गट झालाच की. हे मला पटत नाही. मग मला लोक विचारतात..

"तुम्ही कोणत्याच गटात कश्या नाही? एकट्याच का?"

तर माझं उत्तर असं की..

हो..मी एकटीच. एकटंच राहीलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, माझ्या विचारांचे आणखी लोक असले तर त्यांच्याशी संपर्क करण्यात मला आनंद होणार नाही. पण विचारांचा प्रसार, प्रचार, कौतुक करवून घेण्यासाठी मी माझी शक्ती दवडणार नाही. माझ्या विचारांचं प्रतिष्ठान होऊ देणार नाही."

दुर्गाबाई शब्दप्रभु होत्या.. शब्दपारखी होत्या, पण तरीही त्या विनयाने म्हणतात..

"लेखन हे मलाही केव्हाच सोपं वाटलेलं नाही.त्यातली माझ्या मनापुढे असलेली सिध्दी मला प्राप्तही झालेली नाही. जितकी मी झटते तितके थोडेसे लौकिक यश तेवढे मिळते.पण सिध्दी अधिकाधिक उंच होत जाते."

आज १० फेब्रुवारी.ज्ञानयोगिनी दुर्गाबाईंचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना वाहिलेली ही एक आदरांजली..!