चर्चा:देवराई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


@अभय नातू आणि माहितगार: नमस्कार ! सदर लेखाला विकिकरण साचा लावला आहे, त्यामुळे संपादन करताना काही अडचणी येत आहेत. संदेशही तसेच मिळत आहेत. मी ज्या मासिकाच्या आधारे सदर लेख अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामध्ये पर्यावरण विषयातील उत्तमोत्तम अभ्यासकांचे लेख आहेत व त्यातील मजकूरच मी संपादनासाठी वापरते आहे. डॉ.माधव गाडगीळ, डॉ.हेमा साने ,साईली पलांडे यासारख्या व्यक्ती यावर अभ्यास करतात त्यांचेच विचार मी नोंदविते आहे. हा लेख उत्तम व्हावा यासाठी आपण अधिक काही मार्गदर्शन केल्यास उपयुक्त ठरेल.आर्या जोशी (चर्चा)

@V.narsikar:नमस्कार ! याविषयी आपणही काही मार्गदर्शन करावे.आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी:

या लेखातील अविश्वकोशिय वर्णनात्मकता काढून टाकावी.म्हणजे विकिकरण साच्याची गरज राहणार नाही.(जसे-पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात.- यासारखी वाक्ये. मुळ आशय तसाच ठेवावा.(मा. गाडगीळ सरांची माफी मागतो.) )
  • तसेच, या देवरायांची कल्पना पर्यावरणांचे कसे रक्षण करते आदि बाबीपण टाकाव्यात.
  • पर्यावरण रक्षण ही बाब भारतीयांनी कशी ओळखली व ती अमलात आणली.
  • पर्यावरण रक्षणाच्या आता हाकाबोंबा सुरु आहेत, पण हे आपल्या (so called) अशिक्षित भारतीयांनी कितीतरी वर्षे अगोदर ओळखले होते व निसर्गाचे चक्र अबाधित राखण्यास त्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.जंगले, वनराया देवराया ओरबाडणे ही गोष्ट तेंचा नव्हती. सामाजिक बांधिलकीपण होती.

इत्यादी इत्यादी.सध्या मला इतकेच सुचत आहे. काही अजून सुचले तर येथे टाकतोच. --वि. नरसीकर , (चर्चा) १५:४५, ५ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

@वि. नरसीकर: नमस्कार ! धन्यवाद सर. वाक्यातील ज्ञानकोशीय आशय सांभाळून संपादन करण्याचा प्रयत्न करते. सूचनेसाठी आणि सहकार्यासाठी धन्यवाद.! आर्या जोशी (चर्चा)

  • देवराई असे नाव देण्याची कारणे-भारतात, कोणत्याही धर्माच्या लोकांमध्ये देव हे श्रद्धास्थानी असतात, देवाचेचे नावावर वनाचे नाव ठेवल्याने सहसा माणसे त्याचा ध्वंस करण्यास धजावत नाहीत. (देवाच्या नावाने वळू सोडतात) वगैरे
  • देवरायांचा सभोवतालच्या वातावरणावर, विशेषतः पावसावर व पर्यायाने तेथील पिकांवर होणारा परिणाम
  • भूगर्भ-जलावरचा परिणाम
  • एखादी देवराई हटल्यावर(नेस्तनाबूत झाल्यावर) त्या क्षेत्रात काय पर्यावरणीय बदल झालेत त्याचे असल्यास एखादे उदाहरण
  • सारांश-देवराईची अत्यावशकता असण्याची कारणे, नवीन अथवा असलेल्या रायांच्या वाढीसाठी प्रयत्न-एखाद्या व्यक्तिने विशेष काम केले असल्यास त्याचा उल्लेख

--वि. नरसीकर , (चर्चा) १६:५७, ५ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

@वि. नरसीकर: नमस्कार ! साचा काढला आहे. लेख ब-यापैकी आवश्यक सुधारणा करून,आवश्यक ते मुद्दे घालून तयार करणयाचा प्रयत्न केला आहे. आपण अधिक सुधारणा केल्यात तर उपयुक्त होईल. माझ्याकडून आवश्यक ती भर घालून लेख पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा)

टायगर स्पर्धा[संपादन]

@अभय नातू आणि Tiven2240:सदर लेखाचे बरेचसे काम मी केले आहे. अन्यही संपादक असतील. हा लेख टायगर स्पर्धेच्या यादीत घालता येईल का? महाराष्ट्रातील पर्यावरणाच्या दृष्टीने हा लेख महत्वाचा आहे. आर्या जोशी (चर्चा) १५:४७, ३० एप्रिल २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी: टायगर स्पर्धेसाठी आपण @सुबोध कुलकर्णी: यांच्यासोबत चर्चेत असा. ते या स्पर्धेचे आयोजक आहेत व ते आपल्याला आवश्यक मार्गदर्शन देतील. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:५६, ३० एप्रिल २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: नमस्कार! सदर लेख टायगर स्पर्धेच्या यादीत घेता येईल का? आर्या जोशी (चर्चा) ०७:५१, १ मे २०१८ (IST)[reply]

नकल डकव[संपादन]

या लेखात नकल डकव मजकूर २२.५ % असून त्याचा कॉपीव्हायो मजकूर येथे दिसत आहे. सदर मजकूर लेखाच्या२ नोव्हेंबर २०१७ च्या आवृतीत कायम स्वरूपी केलेला दिसत असून तो @आर्या जोशी: यांनी टाकलेला आढळतो. त्यातील मजकूर लोकप्रभा साप्ताहिकातून घेतलेला आहे. लोकप्रभा चे कार्बन डेटिंग [ {

 "self": "http://carbondate.cs.odu.edu/cd/http://www.lokprabha.com/20090925/paryavaran.htm",
 "uri": "http://www.lokprabha.com/20090925/paryavaran.htm",
 "estimated-creation-date": "2009-09-17T18:58:18",
 "earliest-sources": [
   "last-modified"
 ],
 "sources": {
   "backlinks": {
     "earliest": ""
   },
   "bing.com": {
     "earliest": ""
   },
   "bitly.com": {
     "earliest": ""
   },
   "google.com": {
     "earliest": ""
   },
   "last-modified": {
     "earliest": "2009-09-17T18:58:18"
   },
   "pubdate": {
     "earliest": "2009-09-25T00:00:00"
   },
   "twitter.com": {
     "earliest": ""
   }
 }

} ] असून त्यातील मजकूर लोकप्रभा मध्ये इ.स. २००९ मध्ये होता. कृपया तपासणी करून मजकूर वगळावा हि विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) २०:२८, ५ जून २०१८ (IST)[reply]

@प्रसाद साळवे:ठीक आहे.पाहते.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०८:५७, ६ जून २०१८ (IST)[reply]

@अभय नातू, सुबोध कुलकर्णी, Wikisuresh, आणि Tiven2240: नमस्कार! सध्या काहीही कारण शोधून काॅपीव्हायो प्रकरण आरंभलेले दिसत आहे. या लेखातील संपादने मी मागील वर्षी भवताल या अभिजीत घोरपडे संपादित मासिकातून वाचून केली आहेत.लोकप्रभाचा संदर्भ कुठून आला याबद्दल मी साशंक आहे कारण हा अंक मी पाहिलेला नाही.जरा सर्वांनी लक्ष घालून उचित सहकार्य करावे म्हणचे मलाही लक्षात येईल नेमके काय ते. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) २२:४५, ६ जून २०१८ (IST)[reply]