विकिपीडिया:धूळपाटी१७
नमस्कार, 'जैन धर्म' या विषयावर लेखन करायचे आहेत. यात मला जैन धर्मातील तत्वे काय आहेत ते लिहायचे आहे. पण ज्या विकि. पानावर 'जैन धर्म' असे होते त्याखालीच मी जैन धर्मातील तत्वे लिहिली होती. पण मुळ पान गायब झाल्यासारखे वाटत आहे. आणि मला त्याच पानावर उदा. अहिंसा म्हणजे काय हे त्यासमोर लिहायचे आहे. (लिहावे की न लिहावे) माझ्याकडून जरा गडबड होत आहे. तेव्हा मदत करावी ही नम्र विनंती.
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे १७:४६, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
मी त्या पानावर लिहिण्यापूर्वी जे पान होते. त्या पानाबद्दल म्हणायचे होते. ते पान मला हवे होते. दुर्दैवाने मला ते सापडत नाही. अडल्यानडल्यावर तुम्हाला त्रास देईनच. असो,मदतीबद्दल धन्यवाद. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे ०९:३२, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)
प्रतिप्रश्न
[संपादन]- वरील प्रश्ना सोबत खालील माहिती आपण देऊ शकल्यास आपला शोध अधिक सहज शक्य होईल.
- आपण स्वतःच्या सदस्य पानाचे योगदान तपासले आहे काय्?
- आपण संबधीत पानाचा इतिहास तपासला आहे काय ? आपाण बदल करताना कदाचित सदस्य खात्यातून अदाखल झाला होता आणि आपले संपादन अनामिक अंकपत्त्यावरून नोंदवले गेले असण्याची शक्यता असल्यास लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासल्यास मिळू शकते.
- काही वेळा आपण केवळ पानाची झलकच पहातो आणि पान जतन केलेले नसते. खास करून झलक आणि जतन करताना माऊस च्या ऐवजी शॉर्टकटकीज वापरणार्याकडून अशी चूक अनवधानाने घडू शकते.अशा स्थितीत आपण न्याहाळक अजून बंद केला नसेल तर बॅक कळीवर टिचकी मारून मागच्या पानावर गेल्यावर आपले संपादन परत मिळू शकते का हे पाहू शकता
- एका वेळी विकिपीडियाची एका पेक्षा अधीक पाने उघडी होती का ? आपण अनावधानाने सपांदन चुकीच्या पानात तर जतन केले नाही ना ? तसे असेल तर तुमच्या न्याहाळ्काच्या इतिहासात तुम्ही कोणत्या विकिपानांना भेट दिली ते जतन केले असू शकते.
- आपण संपादन केलेला दिवस तारीख वेळ यापैकी काही आठवत असेल तर उपलब्ध करता येईल ?
- आपण संबंधीत लेखाचा इतिहासातील फरक तपासले आहेत का ? कदाचित इतर सदस्याने मजकुर वगळला असेल तर तुम्हाला तो इतिहासातील फतरकातून पुन्हा वापस मिळवता येऊ शकतो.
- एक सारख्या नावाचे दिसणारे एका पेक्षा अधीक लेख असण्याची शक्यता जसेकी जैन धर्म एवजी जैन येथे लेखन झाले असू शकते , र्हस्व दिर्घ कान्हा मात्रा इत्यादींच्या फरकाने त्याच नावाची एकापेक्षा अधीक पृष्ठे असू शकतात.
- नेहमी अजून एक होणारी सहज न उमगणारी चूक त्याच नावाच्या वेगळ्या नामविश्वात लेखन जसे की जैन धर्म च्या ऐवजी वर्ग:जैन धर्म
येथे तर आपले लेखन जतन झाले नाहीना. बहूतेक अशी घटना गूगल सारख्या बाह्य शोधयंत्रावरून किंवा किंवा विकि शोधयंत्रात प्रगत शोध घेताना इतर नामविश्व निवडले गेले असेलतर तसेच एखाद्या लेखाच्या वर्गीकरणास दुवा समजून वर्गपानावर पोहोचल्यामुळे होऊ शकते.
- संबधीत माहिती संबधीत पानावर जतन होऊन नंतर एखाद्या सदस्या ने वगळली असु शकते आपण संबधीत लेखाच्या इतिहासात
- विकिमीडियाच्या विविध प्रकल्पात मिळून आपली एका पेक्षा अधिक सदस्य खाती आहेत काय आणि चुकून आपण वेगळ्या सहप्रकल्पाततर योगदान केले नाही आहे ना ? खास करून एकाच वेळी मराठी विकिपीडिया , मराठी विकिबुक्स , आणि आपण माझ्या प्रमाणे इतर भाषी विकिपीडियावर सुचालन मराठी भाषेत वापरत असाल आणि एकाच वेळी सर्व खिडक्या उघड्या राहील्यातर अनवधानाने इतर सहप्रकल्पात तुमचे योगदान जतन झाले असु शकते तसेच ते त्या प्रकल्पात अयोग्य आहे असे लक्षात आले तर त्या संबधीत प्रकल्पातील एखाद्या सदस्याने वगळले असु शकते.
- लेख पान व लेख पानाचे चर्चा पान
शक्यता १
[संपादन]नमस्कार,
एकतर जैन धर्म लेखात तुम्ही लिहिले म्हणता ते मला दिसते आहे.मी लेखाचा इतिहास तपासला, तुमच्या सदस्य:प्रा.डॊ.दिलीप बिरुटे या सदस्य खात्यावरून दोनदा बदल जतन केले गेले आहेत आणि तुम्ही लिहिले त्यात कोणतीही बदल/ढवळा ढवळ झालेली नाही हे निश्चित.
प्रत्य्क्षात बदल होऊनही जुनेच पान दिसत रहाणे एका तांत्रिक कारणावरून होते. त्यामुळे प्रत्य्क्ष संपादन किंवा झलक व्यवस्थित दिसण्यात कोणताही अडथळा येत नाही. मी सविस्तर उत्तर लिहिणे सुरू करणार आहे. मध्ये ब्रेक पण घेणार आहे. पण थोडक्यात उपाय हा कि तुमच्या न्याहाळक (ब्राऊजर) ची Tools-Options येथे जाऊन स्मृतीशेष (cookies) Delet करून संगणकाचा सय (Cache) रिकामी करणे , सहसा कोणतीही संगणक विषयक माहिती नसलेले व्यक्ति हे स्व्त:च्या संगणकावर स्वत: सहज करू शकते.
चला ब्रेक घेऊन नंतर येऊन अधिक सविस्तर कारण मिमांसा करेन पण मी म्हणालेलेला , Tools-Options येथे जाऊन स्मृतीशेष (cookies -बरीच मराठी मंडळी याला मोदक असा मराठी शब्द योजतात-) Delet करून संगणकाचा सय (Cache) रिकामी करणे हा उपाय करून कळ्वल्यास मी लिहिलेली माहिती कितपत उपयूक्त ठरत आहे याचा मला अंदाजा येण्यास मदत होईल.
माहितगार ०६:००, २१ ऑक्टोबर २००९ (UTC)
तुम्ही विचारलेला प्रश्न एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे त्या बद्दल सविस्तर सहाय्य पान अजून उपलब्ध नाही आणि उत्तर देताना च्या चर्चेच्या निमित्ताने विविध शक्यतांचा विचार केला जाईल . कदाचित तुम्हाला हवे ते पान मी उपलब्धही करू शकेन कानाही माहीत नाही पण एक सविस्तर सहाय्य पान बनवण्यात मला मदत होईल एवढेच मी इथे विस्तार करत राहीन प्रत्येकवेळी वाचले नाहीत तरी चालेल.