यशोवर्मन पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यशोवर्मन पहिला (ख्मेर: ព្រះបាទយសោវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा चौथा सम्राट होता. यशोवर्मन इ.स. ८८९ ते इ.स. ९१०पर्यंत सत्तेवर होता.

यशोवर्मनाच्या राज्यकालातील एक शिल्प

हा पहिला इंद्रवर्मन आणि त्याची राणी इंद्रादेवी यांचा मुलगा होता.[१][२] इंद्रवर्मनने आपल्या पश्चात यशोवर्मनचा भाऊ राजा व्हावा अशी योजना केली होती. इंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर यशोवर्मनाने आपल्या भावाशी युद्ध करून राजसत्ता मिळवली. आपल्याला सत्तेवर न येऊ देण्याची तजवीज केल्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊन यशोवर्मनाने आपली सत्ता वडिलांच्या हक्काने नव्हे तर आईकडील पूर्वज, जे चेन्ला आणि फुनानचे राज्यकर्ते होते, त्यांच्या हक्काने असल्याचे दाखवले.[३]

आपल्या राज्यकालाच्या पहिल्या वर्षात यशोवर्मनाने शंभर आश्रम बांधले. यात ऋषिमुनींना राहण्याची सोय तसेच राजा आपल्या राज्याच्या पाहणीसाठी निघालेला असताना त्याला निवाऱ्याची सोय होती. इ.स. ८९२मध्ये त्याने इंद्रतटक हे इंद्रवर्मनाने सुरू केलेले सरोवर पुढे बांधण्यास सुरुवात केली.[४] याशिवाय त्याने आपल्या नवीन राजधानी यशोधरापूरजवळ यशोधरातटक नावाचे प्रचंड सरोवरही बांधायला सुरुवात केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ठाकुर, उपेन्द्र. सम आस्पेक्ट्स ऑफ एशियन हिस्टरी ॲंड कल्चर (इंग्लिश भाषेत). p. ३७.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ सव्हेरोस, पू. नूव्हेल्स इन्स्क्रिप्शन्स दु कांबोज (फ्रेंच भाषेत). पॅरिस.
  3. ^ Briggs, The Ancient Khmer Empire; page 105.
  4. ^ Jessup, p.77; Freeman and Jacques, pp.202 ff.
मागील
पहिला इंद्रवर्मन
{{{शीर्षक}}}
इ.स. ८८९-इ.स. ९१०
पुढील
पहिला हर्षवर्मन