Jump to content

पहिला हर्षवर्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हर्षवर्मन पहिला (ख्मेर: ហស៌វរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा पाचवा सम्राट होता. हर्षवर्मन इ.स. ९०१ ते इ.स. ९२३पर्यंत सत्तेवर होता.

हा पहिल्या यशोवर्मनचा मुलगा होता.[१] याला रुद्रलोक असेही म्हणत.

हर्षवर्मन आणि त्याचा लहान भाऊ ईशानवर्मन यांनी सत्तेसाठी आपल्या मामा जयवर्मन याच्याशी केलेल्या चढाओढीमुळे याच्या संपूर्ण राज्यकाळात ख्मेरमध्ये शांतता नव्हती. हर्षवर्मनच्या मृत्यूपश्चात ईशानवर्मनने जयवर्मनचा पराजय करून त्यास ख्मेरमधून घालवून दिले.[२]

हर्षवर्मनने फ्नोम बाखेंगच्या पायथ्याशी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ छोटे देउळ बांधले.[३][४][५]

याच्यानंतर ईशानवर्मन सम्राटपदी आला.[६]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Higham, 2001: p.70
  2. ^ Briggs, The Ancient Khmer Empire, page 115.
  3. ^ "The temple complex of Angkor Baksei Chamkrong". Archived from the original on 2019-07-14. २००८-११-१३ रोजी पाहिले.
  4. ^ Higham, C., 2014, Early Mainland Southeast Asia, Bangkok: River Books Co., Ltd., ISBN 9786167339443
  5. ^ केडेस, जॉर्ज. Walter F. Vella (ed.). द इंडियनाझ्ड स्टेट्स ऑफ साउथईस्ट एशिया. trans.Susan Brown Cowing.
  6. ^ The Khmers, Ian Mabbet and David P. Chandler, Silkworm Books, 1995, page 262.
मागील
पहिला यशोवर्मन
{{{शीर्षक}}}
इ.स. ९०१-इ.स. ९२३
पुढील
दुसरा ईशानवर्मन