फुनान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फुनान कंबोडियाच्या दक्षिण भागातील इ.स.चे पहिले शतक ते इ.स. ६१३ कालखंडातील प्राचीन राज्य होते. फुनानच्या शासकांनी भारतामधून बऱ्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतरित होण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्यनियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. या ऐतिहासिक काळात कालवे काढून शेती केली होती असे उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने स्पष्ट होते. कंबोडियाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात भरभरभराटीस आला.

या राज्याची बरीचशी माहिती प्राचीन चिनी दस्तऐवजांमधे मिळते. प्रत्यक्ष कंबोडियामध्ये ती फारशी उपलब्ध नाही.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.