एकदिवसीय साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकदिवसीय साहित्य संमेलन या नावाने अनेक छोट्या गावांमध्ये मराठी साहित्य संमेलने भरतात. त्यांतील काही विभागीय साहित्य संमेलन या नावाखाली होतात. अशा संमेलनांना संमेलनाध्यक्ष असतोच असे नाही. अशा काही ’एकदिवसीय’ संमेलनांची ही माहिती :

  • ठाणे येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या निमित्ताने वाशी येथे २२ डिसेंबर रोजी एकदिवसीय महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे १३ फेब्रुवारी २०१२ रोजी केज येथे दुसरे एकदिवसीय साहित्य संमेलन झाले. डॉ. सतीश सोळुंके संमेलनाध्यक्ष होते.
  • मराठी साहित्य रसिक मंडळातर्फे मुंबईतील चेंबूरमध्ये १३ जानेवारी २०१३ रोजी ११वे एकदिवसीय साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्षपदी अशोक नायगावकर होते.
  • रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २१ ऑक्टोबर २०१३ रोजी एक ’एकदिवसीय साहित्य संमेलन’ झाले होते. संमेलनाध्यक्षपदी सुमेध वडावाला होते. संमेलनाला रामदास फुटाणे, डॉ. विश्वास मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • नादेड येथे १२ एप्रिल, २०१४ रोजी एकदिवसीय मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन झाले. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे भरलेले एक दिवसीय साहित्य संमेलन : १४ फेब्रुवारी, २०१६, संमेलनाध्यक्ष - भारत सासणे
  • मसापच्या शाहूपुरी शाखेतर्फे सातारा साहित्य संमेलन’ या नावाचे एकदिवसीय साहित्य संमेलन १७ फेब्रुवारी २०१५ रोजी सातारा येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी नामांकित सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार डॉ. अनिल अवचट होते.
  • योग विद्या निकेतन व यमुना फाऊंडेशन वाशी, नवी मुंबई यांच्यातर्फे तिसरे एकदिवसीय योग साहित्य संमेलन व प्रदर्शन २९ नोव्हेंबर, २०१५ रोजी वाशीच्या योगभवनमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीकांत बडवे होते.
  • कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने २० वे एकदिवसीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन २९ नोव्हेंबर २०१५ला कारदगा येथे झाले. पिंपरी-चिंचवड येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस याही संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि विविध साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीत २७ डिसेंबर २०१५ रोजी, एकदिवसीय संमेलनपूर्व संमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील होते.
  • कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, देवरूखतर्फे २४ जानेवारी २०१६ रोजी देवरूखमधील माटे-भोजने सभागृहात एकदिवसीय कोकण विभागीय युवा साहित्य संमेलन झाले.


पहा : मराठी साहित्य संमेलने