Jump to content

चर्चा:संगमेश्वर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कसबा संगमेश्वर येथून हलविलेला मजकूर.

अभय नातू (चर्चा) २२:०१, १६ जानेवारी २०१५ (IST)[reply]


चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं ‘संगमेश्वर’ हे आता ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखलं जातं. ‘कसबा संगमेश्वर’ म्हटलं की, दोन प्रमुख गोष्टी नजरेसमोर येतात, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज! अगदी अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं, तर कसब्याचा संबंध ‘होडय़ां’शी जोडला जातो. कसबा हे जरी समुद्रकिना-यालगतच गाव नसलं, तरी गेल्या काही पिढय़ांपासून इथल्या ९० ते ९५ टक्के घरांमधले तरुण हे होडय़ा बांधणीचं काम करणारे कारागीर आहेत. हीदेखील कसब्याची एक महत्त्वपूर्ण ओळख बनली आहे. ‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’ असा आहे. प्रचलित व्यवस्थेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘संगमेश्वर’ नावानं परिचित असलेल्या गावाचं खरं नाव ‘नावडी’ असं असून सध्या त्याला ‘कसबा संगमेश्वर’ असंही संबोधलं जातं. इथल्या इतिहासाची ओळख म्हणजे, इ. स. सुरू होण्याच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्यं होती, यांपैकी जैन पंथीय राजवटीत त्यांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती. परंतु संगमेश्वर हे त्यांचं राज्यकारभाराचं प्रमुख केंद्र होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचं राज्य होतं. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती. पुढे सन ७५३ मध्ये इथल्या राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश करून सुमारे २०० र्वष राज्य केलं. त्यानंतर पुन्हा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकुटांचा पराभव केला व सन ९७३ पासून सन ११३० पर्यंत राज्य केलं. इ. स. ११३० च्या सुमारास कपिलतीर्थ इथला जैन राजा शोणभद्र यानं चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचं राज्य आपल्या राज्याला जोडलं. नंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा शोणभद्र याच्या वंशजाचा पराभव करून आपलं राज्य प्रस्थापित केलं ते इ. स. १४७० पर्यंत! या घराण्याचा शेवटचा राजा ‘जाखूराय’ याचा पराभव करून संगमेश्वर येथे मुसलमानांचा प्रथम प्रवेश झाला. ही मुसलमानी सत्ता पुढे सुमारे १९१ र्वष म्हणजे इ. स. १६६१चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं ‘संगमेश्वर’ हे आता ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखलं जातं. ‘कसबा संगमेश्वर’ म्हटलं की, दोन प्रमुख गोष्टी नजरेसमोर येतात, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज! अगदी अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं, तर कसब्याचा संबंध ‘होडय़ां’शी जोडला जातो. कसबा हे जरी समुद्रकिना-यालगतच गाव नसलं, तरी गेल्या काही पिढय़ांपासून इथल्या ९० ते ९५ टक्के घरांमधले तरुण हे होडय़ा बांधणीचं काम करणारे कारागीर आहेत. हीदेखील कसब्याची एक महत्त्वपूर्ण ओळख बनली आहे. ‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’ असा आहे. प्रचलित व्यवस्थेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या ‘संगमेश्वर’ नावानं परिचित असलेल्या गावाचं खरं नाव ‘नावडी’ असं असून सध्या त्याला ‘कसबा संगमेश्वर’ असंही संबोधलं जातं. इथल्या इतिहासाची ओळख म्हणजे, इ. स. सुरू होण्याच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्यं होती, यांपैकी जैन पंथीय राजवटीत त्यांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती. परंतु संगमेश्वर हे त्यांचं राज्यकारभाराचं प्रमुख केंद्र होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचं राज्य होतं. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती. पुढे सन ७५३ मध्ये इथल्या राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश करून सुमारे २०० र्वष राज्य केलं. त्यानंतर पुन्हा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकुटांचा पराभव केला व सन ९७३ पासून सन ११३० पर्यंत राज्य केलं. इ. स. ११३० च्या सुमारास कपिलतीर्थ इथला जैन राजा शोणभद्र यानं चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचं राज्य आपल्या राज्याला जोडलं. नंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा शोणभद्र याच्या वंशजाचा पराभव करून आपलं राज्य प्रस्थापित केलं ते इ. स. १४७० पर्यंत! या घराण्याचा शेवटचा राजा ‘जाखूराय’ याचा पराभव करून संगमेश्वर येथे मुसलमानांचा प्रथम प्रवेश झाला. ही मुसलमानी सत्ता पुढे सुमारे १९१ र्वष म्हणजे इ. स. १६६१ पर्यंत होती. त्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इ.चा पराभव करून मराठी राज्याची सत्ता स्थापन करून मुसलमानी सत्तेचा बिमोड केला. पुढे संगमेश्वर मराठा सत्तेतच राहिलं. मराठी सत्तेमध्येच मराठय़ांचा भावी राजा असलेले संभाजी महाराज पडकले गेले ते याच कसबा संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वरचं नाव एका दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेनं इतिहासात नोंदलं गेलं. ती तारीख होती, ४ फेब्रुवारी १६८२. मराठी राज्यामध्ये या भागाची महसूल व्यवस्था ज्या सरदेसाई घराण्याकडे होती, त्या सरदेसाई घराण्याचे वंशज आजही कसब्यात आहेत. ज्या सरदेसाईच्या वाडय़ामध्ये संभाजी महाराज पकडले गेले, त्या वाडय़ाच्या खाणाखुणा, त्याच्या मागील बाजूस असलेली काही शिल्प, भग्नावस्थेतली काही शिवमंदिरं आजही त्या घटनेची साक्ष देतात! हे झालं कसब्याचं ऐतिहासिक महत्त्व! सुमारे इ. स. १०० च्या सुमारास चालुक्यकालीन राजा कर्ण या ठिकाणी राज्य करत होता. या कर्णराजानं त्या काळात १० हजार सुवर्णमुद्रा खर्च करून हे मंदिर बांधलं. जे त्याच्याच नावानं पुढे कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हेमाडपंथीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे १९०० वर्षानंतर आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. सुमारे ४०० चौ. मीटर क्षेत्रात संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीवकाम केलेलं असं हे मंदिर आजही कसब्याचं पौराणिक महत्त्व टिकवून आहे. या कर्णराजानं कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळय़ा कामांसाठी सात गावं दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (आजचं धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (आजचं शिवने), यज्ञासाठी लवल (आजचं लोवले), फळांसाठी धमनी (आजचं धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (आजचं कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (आजचं अंत्रवली). यांपैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ मात्र सापडत नाहीत. याच कर्णराजानं कर्णेश्वर मंदिराच्या निमित्तानं त्यावेळी ३६० प्रासाद म्हणजेच मंदिरं बांधली होती. त्यातील काही मंदिरं आजही या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात, त्यामध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदीकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे. कर्णेश्वर मंदिर आणि आसपासची असंख्य छोटी-छोटी मंदिरं ही पांडवकालीन आहेत आणि ती पांडवांनी एका रात्रीत बांधली आहेत, अशी आख्यायिका सांगितली जाते. ही पूर्णपणे खोडून काढता येते. कारण पांडवांची राजधानी म्हणजेच हस्तिनापूर हे ठिकाण उत्तर प्रदेशातील आहे आणि कसब्यातील या मंदिरांची रचना ही दक्षिणेकडील मंदिरांसा पर्यंत होती. त्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इ.चा पराभव करून मराठी राज्याची सत्ता स्थापन करून मुसलमानी सत्तेचा बिमोड केला. पुढे संगमेश्वर मराठा सत्तेतच राहिलं. मराठी सत्तेमध्येच मराठय़ांचा भावी राजा असलेले संभाजी महाराज पडकले गेले ते याच कसबा संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वरचं नाव एका दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेनं इतिहासात नोंदलं गेलं. ती तारीख होती, ४ फेब्रुवारी १६८२. मराठी राज्यामध्ये या भागाची महसूल व्यवस्था ज्या सरदेसाई घराण्याकडे होती, त्या सरदेसाई घराण्याचे वंशज आजही कसब्यात आहेत. ज्या सरदेसाईच्या वाडय़ामध्ये संभाजी महाराज पकडले गेले, त्या वाडय़ाच्या खाणाखुणा, त्याच्या मागील बाजूस असलेली काही शिल्प, भग्नावस्थेतली काही शिवमंदिरं आजही त्या घटनेची साक्ष देतात! हे झालं कसब्याचं ऐतिहासिक महत्त्व! सुमारे इ. स. १०० च्या सुमारास चालुक्यकालीन राजा कर्ण या ठिकाणी राज्य करत होता. या कर्णराजानं त्या काळात १० हजार सुवर्णमुद्रा खर्च करून हे मंदिर बांधलं. जे त्याच्याच नावानं पुढे कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हेमाडपंथीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे १९०० वर्षानंतर आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. सुमारे ४०० चौ. मीटर क्षेत्रात संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीवकाम केलेलं असं हे मंदिर आजही कसब्याचं पौराणिक महत्त्व टिकवून आहे. या कर्णराजानं कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळय़ा कामांसाठी सात गावं दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (आजचं धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (आजचं शिवने), यज्ञासाठी लवल (आजचं लोवले), फळांसाठी धमनी (आजचं धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (आजचं कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (आजचं अंत्रवली). यांपैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ मात्र सापडत नाहीत. याच कर्णराजानं कर्णेश्वर मंदिराच्या निमित्तानं त्यावेळी ३६० प्रासाद म्हणजेच मंदिरं बांधली होती. त्यातील काही मंदिरं आजही या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात, त्यामध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदीकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे. कर्णेश्वर मंदिर आणि आसपासची असंख्य छोटी-छोटी मंदिरं ही पांडवकालीन आहेत आणि ती पांडवांनी एका रात्रीत बांधली आहेत, अशी आख्यायिका सांगितली जाते.