Jump to content

"सुविज्ञ शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट चित्रशिल्पकार | पार्श्वभूमी_रंग = | नाव = सुविज्ञ शर्म...
(काही फरक नाही)

१७:३५, १६ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

सुविज्ञ शर्मा

सुविज्ञ शर्मा
पूर्ण नावसुविज्ञ रामकृष्ण शर्मा
जन्म जुलै २८ , इ.स. १९८३
जयपुर, राजस्थान, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण महराजा सवाई मानसिंह शाळा
भारतीय विद्या भवन विद्याश्रम
भवानीपुर एजुकेशन सोसायटी कॉलेज
सिम्बिओसीस आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालया
पुरस्कार भारत गौरव पुरस्कार
वडील आर.के. शर्मा
आई मीनाक्षी शर्मा
पत्नी चारू शर्मा

सुविज्ञ शर्मा (जन्म २८ जुलै, १९८३) हे एक भारतीय कलाकार, चित्रकार, फॅशन डिझायनर आणि उद्योजक आहेत जे त्यांच्या सूक्ष्म चित्र (मिनीएचर पेंटिंग), तंजोर चित्र, फ्रेस्को चित्र व इतर जिवंत पोट्रेट चित्रांसाठी विख्यात आहेत. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सिटी पॅलेस, जयपुर आणि जामा मस्जिद सारख्या कितीतरी साईट चे जीर्णोद्धार आणि फ्रेस्को चित्रांचे नावलौकिक त्यांचे आहे. प्रतिष्ठित भारत गौरव, २०१२ ने ते सम्मानित आहेत. [][][]

बजाज, बिरला, सिंघानिया, अंबानी, पिरामल, मित्तल व बर्मन सारख्या भारत भरातील कित्येक उच्च घराण्यांमधल्या वैयत्तिक संग्रहांमध्ये त्यांच्या कलाकृतींना प्रतिष्ठित स्थान लाभलं आहे. भारतातील सूक्ष्म कलेचा(मिनीएचर पेंटिंग) वारसा पुढे नेणारे ते एकमेव कलाकार आहेत.

मारवाड इंडिया, सोसायटी, सॅवी, डी एन ए, मिड डे आणि टाईम्स ऑफ इंडिया सारख्या कित्येक प्रतिष्ठित मासिकांमध्ये व वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या कलाकृती छापुन आल्या आहेत. सुविज्ञच्या कलाकृती सिमरोझा आर्ट गॅलरी, चित्रकूट आर्ट गॅलरी, चेन्नई आर्ट गॅलरी, आर्टिसन्स आर्ट गॅलरी व इंडिया हॅबिटॅट सेन्टर सारख्या विभिन्न कला दालानंमध्ये प्रदर्षित झाल्या आहेत. सप्टेंबर २०१४ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ‘एन आर्ट कलेक्टर्स पॅराडाइस’ प्रकाशित केला ज्यात २४ कॅरेट सोन्याने सजवलेल्या कोलोनियल स्टँप पेपर पेन्टिंग्स आहेत व याचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या हस्ते झाले.

प्रारम्भिक जीवन

सुविज्ञ शर्मा यांचा जन्म २८ जुलै, १९८३ रोजी भारतीय राज्य राजस्थान मधील जयपुर या शहरात झाला. वडील आर के शर्मा हे कलाकार असून आई मीनाक्षी शर्मा गृहिणी होत्या. सुविज्ञचे शालेय शिक्षण जयपुर मधील महराजा सवाई मानसिंह व भारतीय विद्या भवन चे विद्याश्रम या शाळांमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी ते कलकत्त्यातील भवानीपुर एजुकेशन सोसायटी कॉलेज येथे गेले व तिथून पदवी मिळवली. त्यांनी पुण्यातील सिम्बिओसीस आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयातून फॉरेन ट्रेड एण्ड एक्सपोर्ट मॅनेजमेंट चा ही अभ्यास केला. सुविज्ञ यांनी आजु-बाजुच्या वस्तूंचे व व्यक्तींचे पोट्रेट रेखाटणे सुरु केले तेव्हा ते अवघ्या ७ वर्षांचे होते.

कारकीर्द

त्यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय राजेशाही कलेचा वारसा दिसत असून त्याचा वलय त्यांनी समकालीन जगात निर्माण केला आहे. त्यांच्या भारतातील आघाडीच्या राजघराण्यांच्या वंशाजांसाठी निर्माण केलेल्या कलाकृतींमध्ये विलास कला व जीवनशैलीचे दुर्मिळ दृश्य दिसुन येते. सुविज्ञ त्यांच्या मार्मिक परीक्षकांना राजेशाही वातावरणात निर्माण केलेल्या उत्कृष्ट कालाकृत्या पाहण्याच्या उत्तम संधी देत असतात. फक्त राजेशाही घराणेच नव्हे तर सुविज्ञचा एक उत्तम ग्राहकवर्ग आहे. बजाज, बिरला, सिंघानिया, अंबानी, पिरामल, मित्तल व बर्मन सारख्या भारत भरातील कित्येक उद्योगपती घराण्यांसाठी सुविज्ञने कलाकृती निर्माण केल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे बॉलीवुडमध्ये ही काही प्रशंसक व ग्राहक आहेत ज्यात प्रियंका चोपङा, राणी मुखर्जी व आदित्य चोपङा यांचा हि समावेश आहे.

सुविज्ञ शर्मा यांचा फ्रेस्को वॉल पेंटिंग, प्युर स्टर्लिंग सिल्वर, चंदन व मकराना संगमरवरी मंदिर, औद्योगिक आणि ख्यातनाम भेटवस्तु व डिझायनिंगशी संबंधित कामांचा विशिष्ठ अभ्यास आहे. त्यांनी जगभरात भ्रमण करून लंडन, ससेक्स व इंग्लंड सारख्या ठिकाणी विविध प्रदर्शने व कार्याशाळांच्या माध्यमातुन कित्येक कालाप्रेमींचे लक्ष वेधले आहे. दरम्यानच्या काळात, त्यांचे काम सगळ्या मोठ्या महानगरांमध्ये व भारतातील सर्व प्रसिध्द कला दालनांमध्ये प्रदर्शित केले होते. सुविज्ञच्या कलाकृती जयपुर आणि उदयपुर च्या हवेल्या, किशनगड, जामा मस्जिदची सुवर्ण पाने, जयपुर सिटी पॅलेसचे काही भाग, बंगले, दर्गा व अनेक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणी दिसुन येतात.

ते याच संदर्भात कार्यशाळा हि चालवतात. जुन्या अनुषंगाने जाऊन, ते जे रंग वापरतात ते १००% नैसर्गिक वनस्पती रंग असतात ज्यांचे निर्माण भाज्यांपासून व इतर नैसर्गिक रत्न जसे पाचू, माणिक व हिरे या पासुन होते.

‘एन आर्ट कलेक्टर्स पैराडाइस’

सप्टेंबर २०१४ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ‘एन आर्ट कलेक्टर्स पैराडाइस’ प्रकाशित केला ज्यात २४ कॅरेट सोन्याने सजवलेल्या कोलोनियल स्टँप पेपर पेन्टिंग्स आहेत व याचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या हस्ते झाले.

सुविज्ञच्या कार्यक्रमाला येऊन खरंच खूप छान वाटले. सुविज्ञ इतक्या तरुण वयात या दर्ज्याचे काम करत आहेत हे खरंच खूप प्रेरणादायी आहे व मला असे वाटते कि तरुण कलाकारांनी त्यांच्या कामापासून प्रेरणा घ्यायला हवी. संपूर्ण प्रदर्शनात ज्या प्रकारे त्यांनी समकालीन व आपल्या पारंपारिक संस्कृतीची सांगड घालुन आपण सगळे प्रेमात असलेल्या तंजोर ला अत्याधुनिक रूप दिले आहे ते समर्पित आहे. मला तंजोर खूप आवडते आणि त्यांनी ज्या प्रकारे तंजोरला जे नवीन रूप दिले आहे ते अप्रतीम आहे. सूक्ष्म कला (मिनीएचर पेंटिंग) हि आपल्याला कित्येक वर्षांपासून माहित असून ती आपल्या परंपरेचा एक भाग आहे. सुविज्ञ त्याच्या घराण्याचा वारसा पुढे घेऊन चालला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्या मुलाला किंवा मुलीला हाच वारसा पुढे घेऊन जाताना बघण्याची इच्छा आहे. - राणी मुखर्जी म्हणाल्या []

सुविज्ञ यांनी सिद्धिविनायकाची विशाल(लाईफ़ साईज़) पेंटिंग चे प्रदर्शन केले आहे जे 4डी मध्ये आहे, जणु देव समोरच आहे ते हि २४ कॅरेट सोने, चांदी व रत्नांचा उपयोग करून. संपूर्ण भारतातली हि एकमेव 4डी कलाकृती आहे. त्याच बरोबर, १००% अस्सल दुर्मिळ स्टँप पेपर वर २२ विविध सुवर्ण चित्रे हि प्रदर्शित आहेत. त्यांच्या प्रदर्शनांमध्ये श्याम सिंघानिया, मिकी मेहता, छाया मोमाया, फेरोझा गोदरेज व अनघा बिस्वास सारख्या दिग्गज आणि प्रमुख व्यक्ती दिसुन येतात.

वैयत्तिक जीवन

सुविज्ञ यांचा विवाह चारू शर्मा यांच्याशी झाला आहे, त्या एक स्वयंसेवी संस्था चालवतात, जिथे नियमितपणे जयपुर जवळच्या एका गावात कला शिबिरे घेतली जातात. हे दांपत्य इथल्या दूरस्थ भागांमधील महिला व तरुण मुलींना त्यांच्यातील कला ओळखण्यास मदत करते. त्यांना एक मुलगा आहे अभिज्ञ.

मान्यता

२९ च्या तरुण वयात सुविज्ञ शर्मा यांना २०१२ रोजी भारत गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

इतर

मार्च २०१५ रोजी सुविज्ञ शर्मा हे स्माईल फाउंडेशनसाठी मुलींच्या शिक्षणासारख्या थोर कारणासाठी रॅम्प वर प्रमुख टीवि व बॉलीवूड कलाकारांसोबत चालले होते.

बाह्य दुवे

संदर्भ

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत