Jump to content

टॅन्टेलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टांटालम या पानावरून पुनर्निर्देशित)

(Ta) (अणुक्रमांक ७३) रासायनिक पदार्थ. पृथ्वीवर याचे अस्तित्त्व ०.०००२ % भरते. टांटालमचे १३० पेक्षा जास्त खनिजे सापडतात पैकी टॅंटालाइट हे प्रमुख खनिज आहे.


,  Ta
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
- आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson


Ta

गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | विकिडेटामधे

टांटालम हा करड्या रंगाचा उजळ धातू असून त्यास निळी छटा आहे. त्याचा वितळणबिंदू ३०००° से. असून याबाबतीत केवळ टंग्स्टन आणि ऱ्हेनियम हेच काय ते टांटालमच्या पुढे आहेत. टांटालमच्या मदतीने अनेक प्रकारची यांत्रिक कामे उत्तमप्रकारे करता येतात. त्याचा पत्रा केवळ ०.०४ मि. मी. जाडीचा असू शकतो आणि त्याची तारही तयार करता येते.

टांटालमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तो ऍक्वा रेजिया आणि नायट्रिक आम्लातही विरघळत नाही म्हणून रसायन उद्योगातील एक महत्त्वाचा धातू अशी टांटालमची ओळख आहे. आम्ले निर्माण होणाऱ्या कारखान्यात टांटालमचे साहित्य वापरले जाते. हायड्रोक्लोरिक, सल्फ्यूरिक, नायट्रिक फॉस्फॉरिकऍसेटिक आम्ले, हायड्रोजन पेरॉक्साईड, ब्रोमिन आणि क्लोरिन निर्मिती क्षेत्रात टांटालम वापरले जाते. फक्त हायड्रोफ्ल्यूरिक आम्ल आणि टांटालमचे जमत नाही.

ग्रीक कथा

[संपादन]

ग्रीक पुराणकथेप्रमाणे झ्यूसचा मुलगा व फ्रिजियाचा राजा टॅंटलस याने एकदा देवांना भोजनाचे निमंत्रण दिले व आपला मुलगा पेल्पॅल्सच्या मांसाची मेजवानी त्यांना दिली. त्याच्या या कृत्याने नाराज होऊन देवांनी टॅंटलसला शाप दिला की, तो सतत भुकेला, तहानलेला व यातनामय जीवन जगेल. देवांच्या शापाप्रमाणेच पुढे घडले, टॅंटलस अतिशय कष्टाचे जीवन जगला.

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

१८०२ साली स्वीडनचे रसायनशास्त्रज्ञ अँड्रिस एकबर्ग यांना एक मूलद्रव्य सापडले. या पदार्थावर एकबर्ग यांनी अनेक प्रयोग केले, विविध आम्ले वापरून पाहिली पण तो पदार्थ कशालाही दाद देईना. यावरून एकबर्ग यांना ग्रीक पुराणकथेतील यातना सहन करणाऱ्या टॅंटलसची आठवण झाली आणि शास्त्रज्ञ एकबर्ग यांनी या पदार्थास टांटालम असे नाव दिले. त्यानंतर एकबर्ग यांना असे कळले की याच गुणधर्माचा आणखी एक पदार्थ एक वर्ष आधी म्हणजे १८०१ मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हॅचेट यांनी शोधून काढले व त्याचे नाव कोलंबियम असे ठेवण्यात आले आहे. टांटालम आणि कोलंबियम हे दोन वेगवेगळे पदार्थ की एकच यावरून अनेक शास्त्रज्ञांमध्ये मतभेद होते. हा गैरसमज / मतभेद १८४४ साली संपले, त्यावर्षी जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेन्रिक रोझ यांनी कोलंबियम आणि टांटालम हे दोन पूर्णपणे वेगळे धातू असल्याचे सिद्ध केले आणि कोलंबियमला नायोबियम असे नाव दिले.