सयाजी शिंदे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सयाजी शिंदे | |
|---|---|
| जन्म | सयाजी शिंदे |
| कार्यक्षेत्र | अभिनय (नाटके, चित्रपट), चित्रपटनिर्मिती |
| भाषा | मराठी (स्वभाषा, अभिनय) कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी (अभिनय) |
सयाजी शिंदे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. कॉलीवुड-टॉलीवुड चित्रपटसृष्टींत याचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असून मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व हिंदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर याने कॉलीवुड व टॉलीवुडाची वाट धरली. याने आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० हिंदी, ४ मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत.
अभिनयासोबत याने चित्रपटनिर्मितीही केली आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी (इ.स. २००९), डांबिस (इ.स. २०११) या मराठी चित्रपटांचा हा सहनिर्माता होता.
बाह्य दुवे [संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील सयाजी शिंदेचे पान (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |