व.कृ. नुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


व.कृ. नूलकर हे संस्कृतचे विद्वान असून पुण्यातील नेस वाडिया कॉमर्स कॉलजचे प्राचार्य होते.

ते एक मराठी लेखक आणि प्रकाशकही आहेत.

नुलकर हे दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाद्वारे आयोजित होत असलेल्या परीक्षांचे परीक्षक म्हणून काम पाहतात.

धुळ्याच्या इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.[१]

प्रा. व.कृ. नूूलकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • दत्तदर्शन
  • श्री देवदेवेश्वर संस्थान (पेशव्यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या पर्वतीवरील आणि सारसबागेतील देवळांची व्यवस्था पाहणाऱ्या संस्थानासंबंधी)
  • प्रपंचसार (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)
  • भट्टीकाव्यम्‌ (मूळ संस्कृत, लेखक भट्टी)
  • शिशुपाल वध महाकाव्य (मूळ संस्कृत, लेखक माघ)
  • सनत्सुजातीय ललितात्रिशती अध्यात्मपटल (मूळ संस्कृत, लेखक आदि शंकराचार्य)

प्रा. नूलकर यांनी संपादित/प्रकाशित केलेली पुस्तके[संपादन]

  • सार्थ उपनिषत्संग्रह (लेखक - हरि रघुनाथ भागवत)
  • सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (लेखक - सोनोपंत दांडेकर)

पुरस्कार[संपादन]

प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठतर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. व.कृ. नूलकर यांना ‘मंजिरी जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला (१८ जानेवारी, २०१६)

  1. ^ राजवाडेतील 1 लाख ऐतिहासिक कागदपत्रांचे डिजिटलायझेशन 26 हजार पानांचेे स्कॅनिंग पूर्ण.