विश्वनाथ सत्यनारायण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विश्वनाथ सत्यनारायण | |
पंडीत नेहरूंसमवेत विश्वनाथ सत्यनारायण |
|
| जन्म | ६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ नंदनूर, कृष्णा जिल्हा, आंध्रप्रदेश |
| मृत्यू | १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६ |
| राष्ट्रीयत्व | तेलुगू, भारतीय |
| भाषा | तेलुगू |
| साहित्यप्रकार | कादंबरी, कविता |
| विषय | रामायण |
| प्रसिद्ध साहित्यकृती | वेयिपंगलु मध्याकरलु रामायण कल्पवृक्षमु |
| पुरस्कार | ज्ञानपीठ साहित्य अकादमी पद्मभूषण |
| वडील | शोभनाद्री |
| पत्नी | पार्वतीदेवी |
विश्वनाथ सत्यनारायण (तेलुगू: విశ్వనాథ సత్యనారాయణ ; रोमन लिपी: Viswanatha Satyanarayana) (६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६) हे तेलुगू भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. साहित्यिक योगदानाबद्दल यांना ज्ञानपीठ पुरस्कार [१] व साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
अनुक्रमणिका |
जीवन[संपादन]
विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वडिलांचे नाव शोभनाद्री आणि आईचे नाव पार्वतीदेवी असे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालयीन शिक्षण मछलीपटणमच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. इ.स. १९२९ साली त्यांना मद्रास विद्यापीठाकडून संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरूवात केली.
इतर[संपादन]
सत्यनारायणांनी लिहिलेल्या "वेयिपंगलु" या कादंबरीचा पी.व्ही. नरसिंहराव यांनी हिंदीत "सहस्रफण" या नावाने अनुवाद केला.
सन्मान[संपादन]
- "वेयिपंगलु" या कादंबरीसाठी आंध्रविश्वविद्यालय पुरस्कार (इ.स. १९३८)
- "मध्याकरलु" या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार.
- "रामायण कल्पवृक्षमु"साठी ज्ञानपीठ पुरस्कार [१] (इ.स. १९७१)
- भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९७०)
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ↑ १.० १.१ ज्ञानपीठ पुरस्कारविजेते. भारतीय ज्ञानपीठ (अधिकृत संकेतस्थळ). २ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |