विद्यापीठ अनुदान आयोग
विद्यापीठ अनुदान आयोग ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणातील सर्वोच्च संस्था आहे. शिक्षणक्षेत्रातील विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १९५३ मध्ये करण्यात आली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या अखत्यारीत ही योजना आहे. उच्चशिक्षणाला दिशा देण्याचे कार्य विद्यापीठ अनुदान आयोग करत असतो. विद्यापीठ अनुदान आयोगाची उद्दिष्टे खालील गोष्टींमध्ये गुणवत्ता राखण्याची आहेत.
- उच्चशिक्षणाचा दर्जा
- अभ्यासक्रम
- संशोधन
- प्राध्यापकांची पात्रता
- विद्यार्थ्यांचा विकास
- शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणांची अंमलबजावणी काही प्रमाणात अभिमत, खासगी, स्वायत्त व सरकारी विद्यापीठे (केंद्रीय व राज्य सरकारांची) यांच्या मार्फत केली जाते.
भविष्य[संपादन]
विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय अधिस्वीकृती व मूल्यांकन प्राधिकरण या संस्था बरखास्त केल्या जाणार असून, यापुढे राष्ट्रीय उच्चशिक्षण आणि संशोधन आयोग ही शिखर संस्था स्थापून उच्चशिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी नियोजन केले जाईल.
बाह्य दुवे[संपादन]
विद्यापीठ अनुदान आयोग संकेतस्थळ (इंग्रजी)