विज्ञान आश्रम
विज्ञान आश्रम (English: Vigyan Ashram[१]) पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे.ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खऱ्या शिक्षणाचा इतिहास घडला. आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग नंतर विज्ञान आश्रम हे मीरा कलबाग(अम्मा) म्हणजेच त्यांच्या पत्नी यांनी संभाळल. पण १८ मार्च २०१६ला त्याचं निधन झाले. आता पूर्ण विज्ञान आश्रम हे डॉ.योगेश कुलकर्णी हे पाहतात. योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रमचे कार्यकारी संचालक आहेत.[२]
‘शिकायचे ते हाताने काम करतच’ हे आश्रमाचे मुख्य ब्रीद आहे. येथील अभ्यासक्रमात शेती-पशुपालन, अन्नप्रक्रिया, प्रयोगशाळेतील चाच्ण्या आदींचा समावेश असलेला गृह व आरोग्यज्ञान विभाग, फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम आदींचा समावेश असलेला अभियांत्रिकी विभाग, तर सौरऊर्जा, जैविक तंत्रज्ञान, आदींचा समावेश असलेले ऊर्जा-पर्यावरण असे वेगवेगळे विभाग आहेत. ‘विज्ञान आश्रमा’तील विद्यार्थी तंत्रज्ञानावर आधारलेले विविध प्रकल्प प्रत्यक्ष काम करत शिकतात. सोलर दिवे तयार करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारखी तंत्रे वापरून शेती उत्पादन घेणे, बांधकामाची नवीन तंत्रे वापरून शिकणे, खाद्य पदार्थांची निर्मिती करणे आदी बाबी ते काम करता करता शिकतात. शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण आहे. मात्र, एखादे काम करताना विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने विविध विषयांतील संकल्पनांची ओळख करून देण्यावर तेथे भर दिला जातो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करताना भौतिकशास्त्रातील संकल्पना शिकता येतात. शेतीत पीक घेताना जीवशास्त्र, गणित आदी अनेक विषयांतील कल्पना सहजपणे शिकता येतात. काम करता करता संकल्पना स्पष्ट करून शिकवले, की ते विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटत नाही. नेहमीच्या पुस्तककेंद्री शिक्षणात ज्यांना रुची नाही आणि त्यामुळे जे शैक्षणिक प्रगती करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घेऊन ‘विज्ञान आश्रमा’ने ही संकल्पना सिद्ध केली आहे. तेथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडोजण स्वतःचे व्यवसाय करत आहेत.
विज्ञान आश्रम मधील शिक्षण पद्धती
[संपादन]विज्ञान आश्रमात विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. झारखंड, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांतून मुले-मुली येथे शिकण्यासाठी येतात. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम आश्रम गेली ३१ वर्षाहून अधिक काळ करत आहे. ”शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास “हे ध्येय डोळ्यसमोर ठेवून जानेवारी १९८३ मध्ये डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली. पुण्यातील ‘भारतीय शिक्षण संस्थाचे’ विज्ञान आश्रम हे केंद्र आहे. Dept.Of Science and Technology(DST), ’Asha For Education’अश्या अनेक संस्थाच्या आर्थिक सहकार्याने ’विज्ञान आश्रम’ आपला कार्यक्रम राबवत आहे.
ग्रामीण विकासाठी तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञाण्याचा वापर करून प्रगती करणे शक्य आहे.नवीन तंत्रज्ञानाने आपण विकासाची गती वाढवू शकतो. हे तंत्रज्ञान अगदी गावागावापर्यंत पोहचवण्यासाठी त्यावर आधारित उद्योग सुरू व्हायला हवेत. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार करण्याचा विज्ञान आश्रमाचा प्रयत्न आहे.
विज्ञान आश्रम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्य्साक्रम घेतले जाते.
- अनौपचारिक शिक्षण कार्यक्रम
- औंपचारिक शाळांसाठी कार्यक्रम
- तंत्रज्ञान विकसन विभाग
IBT(Introduction To basic Technology)
[संपादन]२)औपचारिक शाळांसाठी कार्यक्रम (IBT):-
कृतिशीलता, उद्योजकता, सृजनात्मक शक्तीचा विकास, आत्मविश्वास यासारखे गुण विकसित होण्यासाठी शालेय स्तरांपासून विद्यार्थ्यांनी ‘उत्पादक कामात’सहभागी झाले पाहिजे शालेय अभ्यासक्रम व जीवनाश्यक गोष्टीचे नाते असते. हे सर्व सध्या करण्यासाठी विज्ञान आश्रमाने IBT सुरू केला आहे. ८ वी ते १० चे विद्यार्थी ‘हाताने काम करत शिकणे’या तत्त्वावर शिकतात S.S.C. बोर्डाची मान्यता असल्यामुळे हे कोणत्याही शाळेमध्ये राबवता येते. आठवड्यातील एक दिवस ह्या विषयासाठी द्यावा लागतो. अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके, नवीन लोकपयोगी सेवा, नवीन तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आरेखन प्रकप्ल ई.विषयांवर प्रशिक्षण घेतले जाते.
चित्रदालन
[संपादन]-
Shrinath Kalbag photo at Vigyan Ashram
-
Mira Kalbhag(Amma)
-
QR code for Pabal
-
Scanning in Vigyan Ashram2
-
Vigyan Ashram 01
-
Dr. S.S. Kalbag photo in Vigyan Ashram
-
Day 1 of TTT 2019 05
-
Scanning demonstration at WAT2019
-
3d design of tooth paste dispencer
-
TTT 2019 Group Photograph
-
Group photo of the participants of the WAT2019
-
Pavan santhosh teaching about Statswiki to participants at Day 2 of TTT 2019
-
सुपर २० च्या मुलींना विकिपीडियाचे प्रशिक्षण देताना
-
Savitrichya Online Leki (Savitri's Online Daughters)
-
WORKSHOP OF VIGYAN ASHRAM
-
सुपर २० च्या मुलींना विकिपीडियाचे प्रशिक्षण देताना
-
Vigyan Ashram Fab Lab 0
-
अम्माच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त stone पेंटिंग आणि fabric पेंटिंग कार्यशाळा
-
अम्माच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त stone पेंटिंग आणि fabric पेंटिंग कार्यशाळा
-
TTT program in Mysure
-
Mini TTT program in Pune
-
group photo of fabric painting and stone painting workshop
-
teach to student about 3d printer
-
teach Arduino to student for smart samai project
-
learning student of 3d design
-
teach to student of 3d design
डॉ. नील ग्रेसेंफेल्ड, (डायरेक्टर, बिट्स आणि अणूंचे केंद्र, एमआयटी (यूएसए)) यांनी फॅब लॅब तयार केले, ते विज्ञान आश्रम 'फॅब लॅब - 0' म्हणून वर्णन केले.डॉ. कलबाग आणि डॉ. नील ग्रेसनफल्ड यांच्यात २००२ मध्ये व्हीए-फेब प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. ग्रामीण भागात काम करणारी ही संस्था लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करते. विज्ञान आश्रमची Fab lab ही सध्या सौर उर्जा, शेतीचे आधुनिकीकरण, कृत्रिम electronic हात यांवर काम करत आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Vigyan Ashram". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-09.
- ^ "Vigyan Ashram". vigyanashram.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-04 रोजी पाहिले.