लिव्हिव
| लिव्हिव Львів (युक्रेनियन) |
|||
लिव्हिवचे जुने शहर-केंद्र |
|||
|
|||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| राज्य | लिव्हिव ओब्लास्त | ||
| स्थापना वर्ष | तेरावे शतक | ||
| क्षेत्रफळ | ४०५ वर्ग किमी | ||
| समुद्रसपाटीपासुन उंची | ९७१ फूट | ||
| लोकसंख्या (२०१०) | |||
| - शहर | ७,६०,००० | ||
| - घनता | ४,२९८ प्रति वर्ग किमी | ||
| - महानगर | १४,९८,००० | ||
| city-adm.lviv.ua | |||
लिव्हिव (युक्रेनियन: Львів;
उच्चार ; पोलिश: Lwów; रशियन: Львов; जर्मन: Lemberg; लॅटिन: Leopolis) हे युक्रेन देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंडच्या सीमेजवळ वसले असून ते लिव्हिव ओब्लास्तचे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
इ.स. १२५६ साली स्थापण्यात आलेले लिव्हिव शहर आजवर अनेक महासत्तांचा भाग राहिले आहे. १३३९ - १७७२ दरम्यान पोलंडचे राजतंत्र, १७७२ - १९१८ दरम्यान ऑस्ट्रियन साम्राज्य, १११८ - १९३९ दरम्यान दुसरे पोलिश प्रजासत्ताक ह्यांनी लिव्हिववर सत्ता चालवली. दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर सोव्हियेत संघाने लिव्हिववर कब्जा मिळवला व लिव्हिव युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले. ऑपरेशन बार्बारोसादरम्यान जुलै १९४१ मध्ये नाझी जर्मनीने लिव्हिव काबीज केले व जुलै १९४४ पर्यंत तेथे राज्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लिव्हिव पुन्हा सोव्हियेत युक्रेनच्या अधिपत्याखाली आणण्यात आले.
ऐतिहासिक काळापासून लिव्हिवमध्ये पोलिश व ज्यू लोकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य राहिले आहे. दुसर्या महायुद्धातील होलोकॉस्ट दरम्यान येथील जवळजवळ सर्व ज्यूंची कत्तल करण्यात आली व महायुद्ध संपल्यानंतर सोव्हियेत संघाने येथील बहुसंख्य पोलिश लोकांना हाकलून लावले. ह्याचा परिणाम म्हणजे आजच्या घडीला येथे केवळ ०.९ टक्के पोलिश व ०.३ टक्के ज्यू राहिले आहेत.
क्रीडा [संपादन]
पोलिश फुटबॉलची सुरुवात लिव्हिवमध्ये झाली असे मानण्यात येते. युएफा यूरो २०१२ साठी निवडण्यात आलेल्या ८ यजमान शहरांपैकी लिव्हिव एक आहे.
गॅलरी [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- www.lviv.travel — अधिकृत भेटस्थळ
- city-adm.lviv.ua — नगर परिषद (युक्रेनियन)
- www.inlviv.info — पर्यटन (इंग्रजी)