रोहित (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उंच मानेचा व उंच पायाचा हा पक्षी साधारणपणे उथळ पाणथळी जागेत आढळुन येतो. याला इंग्रजी मध्ये फ्लेमिंगो असे म्हणतात जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. मोठे मोठे हजारोच्या संख्येने यांचे थवे आढळुन येतात. भारतात पण हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो. याचे मुख्य खाद्य म्हणजे छोटे मासे, किडे, पाणवनस्पती व शेवाळे. काहि विशिठ्य प्रकारचे शेवाळे खाल्यामुळे यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे वैष्यीठ्य आहे.

रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर करतात. बहुंताशी रोहित पक्षी हे कच्छ च्या रणामधिल रहिवाशी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अश्या ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारुन त्यात अंडि घालतात व पिल्लाना वाढवतात. पाणी व उन पुष्कळ असल्याने भरपुर खाद्य असते त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडि घालतात त्या भागाला कच्छ मध्ये रोहित पक्ष्यांचे शहर (Flamingo City) असे म्हणतात. अफ्रिकेत पण व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये अशीच मोठी मोठी रोहित पक्ष्याची वसती स्थाने आहेत.

रोहित पक्ष्याची चोच

पावसाळ्यानंतर कच्छ मध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात.

रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैश्यिठ्यपुर्ण असते. चोचीचा आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतीशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात.

रोहित पक्ष्याचे अनेक उपप्रकार आहेत

रोहित पक्ष्याचे तीन उपप्रकार
  • ग्रेटर फ्लेमिंगो. ( मोठा रोहित पक्षी) -
  • लेसर फ्लेमिंगो- भारतात प्रामुख्याने हा रोहित पक्ष्याचा उपप्रकार आढळुन येतो. हा मुख्यत्वे पांढरा असुन पंखाखालि गुलाबी रंगाची वाढ होते.
  • कॅरिबियन फ्लेमिंगो - हा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळुन येतो व गुलाबी छटेचे प्रमाण जास्त असते व आकाराने मोठ्या रोहित पक्ष्यापेक्षा मध्यम असतो.
  • चिलियन फ्लेमिंगो - हा आकाराने सर्वात लहान रोहित पक्षी आहे. याचे अस्तित्व चिली व अँडिज पर्वतात आढळुन येते.
वैयक्‍तिक साधने