महमूद अहमदिनेजाद
महमूद अहमदिनेजाद (जन्म: २८ ऑक्टोबर १९५६) हे इराण देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अहमदिनेजाद २००५ साली सत्तेवर आले व जून २००९ मधील वादग्रस्त अध्यक्षीय निवडणुक जिंकल्यानंतर ते पुढील ४ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहतील.
अहमदिनेजाद ह्यांनी आपल्या कारकिर्दीत पश्चिम जगाशी नकारात्मक व भांडखोर पवित्रा घेतला आहे. जर्मन नाझींनी ज्यू लोकांची केलेली कत्तल ते नाकारतात, इस्रायल देशाला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू असे वक्तव्य त्यांनी वारंवार केले आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाला ते मुस्लिम जगाचा सर्वात मोठा शत्रू मानतात. अध्यक्ष बराक ओबामांनी पुढे केलेला मैत्रीचा हातही त्यांनी नाकारला आहे. त्यांच्या ह्या धोरणांमुळे व त्यांच्या कारकिर्दीत इराण देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची बनल्यामुळे अहमदिनेजाद ह्यांनी इराणमधील उदारमतवादी व तरुण पिढीचा पाठिंबा गमावला आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |