मल्लखांब
मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे.
कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधी नंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली. गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे.
स्वरूप [संपादन]
लाकडी स्तंभ [संपादन]
मल्लखांब हा लाकडाचा एक स्तंभ असतो. याची उंची सुमारे आठ फूट असते. हा सरळ, गुळगुळीत, वर निमुळता होत जाणारा असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो. त्याच्या जमिनीवरील भागाचा आकार वर गोल , मग अरुंद भाग खाली भक्कम खांब असा असतो.
दोरी [संपादन]
हा हलता मलखांबाचा प्रकार टांगलेल्या दोरखंडावर केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो.
वेताचा मल्लखांब [संपादन]
वेतावर केला जाणारा प्रकार.
टांगता मल्लखांब [संपादन]
प्रसिद्ध मलखांब पटू व प्रचारक [संपादन]
- बाळंभटदादा देवधर - बाजीराव पेशवेकाल (पहिला ‘आखाडा’ वाराणसी येथे स्थापन केला.)
- कोंडभटनाना गोडबोले
- दामोदरगुरू मोघे - वडोदरा
- नारायणगुरू देवधर
- टकेजमाल - वाराणसी
- जुम्मादादा - वाराणसी
- प्रा. माणिकराव
- रामचंद्र हरनाथ पेंटर - ग्वाल्हेर
- हरी महादेव तथा तात्यासाहेब सहस्रबुध्दे - वडोदरा
- गजाननपंत टिळक - वडोदरा
- गोविंदराव तातवडेकर - वडोदरा
- धोंडो नारायण विद्वांस - वडोदरा
- लक्ष्मण नारायण सप्रे - वडोदरा
- वसंत बळवंत कप्तान - वडोदरा
- रंगनाथ वाटोरे - वडोदरा
- विष्णू मार्तंड डिंगरे - उज्जैन
- दामोदर बळवंत भिडे - सातारा
- गणेश सखाराम वझे मास्तर - पुणे
- भाऊराव गाडगीळ - पुणे
- कासमभाई - पुणे
- सरदार अनंत हरी खासगीवाले - पुणे
सद्य [संपादन]
- आबा घाडगे
- रमेश वझे
- दत्ता शिरसाठ
- दीपक पाटील
- विवेक तापकिरे
- यशवंत जाधव
- राजेश्वरी पिल्लई
- नेहा घायाळ
- मंगेश वायकूळ
- आदित्य म्हसकर
- मानके शिवप्रसाद
- पूनम कुलथे
संस्था [संपादन]
- मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटना
- साने गुरुजी आरोग्य मंदिर (मिलन सिग्नलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई (9869121410, 9869577130))
- हौशी मलखांब संघटना
- अकोला जिल्हा मलखांब संघटना
- नाशिक जिल्हा मलखांब संघटना
स्पर्धा [संपादन]
- जिल्हा निवड स्पर्धा
- जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा
- भाऊसाहेब रानडे नवोदित मलखांब स्पर्धा
- प्रबोधन मल्लखांब स्पर्धा
- आंतरशालेय मलखांब स्पर्धा
- मुंबई महापौर चषक
- अखिल भारतीय निमंत्रित मलखांब स्पर्धा
- राज्यस्तरीय मिनी स्पर्धा
- सबज्युनिअर मलखांब स्पर्धा
- मॉरिशस विश्व मलखांब स्पर्धा
हे ही पाहा [संपादन]
पुस्तके [संपादन]
- म म मल्लखांबाचा महाराष्ट्राचा - श्रीनिवास हवालदार