बीजगणित विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
बीजगणित ही गणिताची एक मुख्य शाखा आहे. बीजगणिताची व्यापक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. एखाद्या गोष्टीची बनावट (Structure), संबंध (Relation) आणि प्रमाण (Quantity) ह्यांचा अभ्यास गणिताच्या ज्या शाखेत होतो त्यास बीजगणित असे म्हणतात. बीजगणितास इंग्रजीमधे Algebra असे म्हणतात. इंग्रजीमधील अल्जिब्रा हे नाव मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी ह्या एका इराणी गणितज्ञाच्या "अल्-किताब अल्-जब्र वा-इ-मुकाबला" (अरबी भाषेत الكتاب الجبر والمقابلة ) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.