बिबटेमांजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिबटेमांजर
Bengalkatze.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: फेलिडे
जातकुळी: प्रियोनेलुरुस
जीव: प्रि. बेंगालेन्सिस
शास्त्रीय नाव
प्रियोनेलुरुस बेंगालेन्सिस
रोबर्ट केर, १७९२
Leopard cat range.PNG


बिबटेमांजर हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते म्हणून याला बिबटेमांजर असे म्हणतात. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.

या मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो.