फ्रायबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रायबुर्ग हे जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यात वसलेले शहर असून जर्मनीतील सर्वात उबदार शहर म्हणून ओळखले जाते. हे शहर फ्रायबुर्ग विद्यापीठासाठीही प्रसिद्ध आहे. फ्रायबुर्ग विद्यापीठ जर्मनीतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना १४५८ साली झाली. या विद्यापीठात सौर-ऊर्जेवर अतिशय उच्च दर्जाचे संशोधन होते. फ्रायबुर्ग येथील द्राक्षाच्या मळ्यासाठी व उच्च दर्जाच्या वाईनसाठी प्रसिद्ध आहे.

भूगोल- हे शहर जर्मनीच्या नैरुत्य कोपऱ्यामध्ये वसलेले असून शहराच्या पश्चिमेला र्‍हाइन नदीच्या पलिकडे फ्रान्सची सीमा आहे तसेच येथुन स्विर्झलंडची सीमाहि जवळ आहे. शहराच्या पुर्वेला ब्लॅक फॉरेस्टच्या डोंगररांगा आहेत.