तुळस
तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum tenuiflorum, ओसियम टेन्युइफ्लोरम ; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल ;) ही लेबियाटी म्हणजे पुदिण्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीचे रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजिऱ्या म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.
अनुक्रमणिका |
तुळशीच्या जाती [संपादन]
- काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Hoary basil(Ocimum americanum)
- रान तुळस - Sweet basil(Ocimum basilicum)
- राम तुळस - Shrubby basil(Ocimum gratissimum)
- कृष्ण तुळस - Sacred basil(Ocumum sanctum/tenuiflorum)
- कापूर तुळस - Camphor basil(Ocimum kilimandscharicum)
- औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone(Ocimum viride)
हिंदू धर्मातील स्थान [संपादन]
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतिक आहे. हिंदू धर्मात घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. नित्य नियमाने तिची पूजा केली जाते. रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षणा घालतात. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यु झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.
औषधी उपयोग [संपादन]
- या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत.