ढगाळ बिबट्या
| ढगाळ बिबट्या | ||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
|
||||||||||||||
| शास्त्रीय नाव | ||||||||||||||
| निओफेलिस नेब्युलोसा (ग्रिफिथ, १८२१) |
||||||||||||||
ढगाळ बिबट्याचा आढळप्रदेश
|
||||||||||||||
| इतर नावे | ||||||||||||||
|
फेलिस मॅक्रोसेलिस |
ढगाळ बिबट्या (शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa, निओफेलिस नेब्युलोसा ; इंग्लिश: Clouded Leopard, क्लाउडेड लेपर्ड) हा भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे. याचा सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे.
[संपादन] वर्णन
ढगाळ बिबट्या हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे. हा आकाराने खूपच लहान असतो व वजन जेमतेम २०-२२ किलोपर्यंत भरते. मांजरांमध्ये मार्जारकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते. तो पिल्लांना झाडाच्या ढोलीत वाढवतो[२].
मार्जार कुळातील मोठ्या मार्जारांमध्ये व ढगाळ बिबट्यांमध्ये कवटीची रचना व दात या दोन बाबतीत तफावत असते. ढगाळ बिबट्याचे वरचे सुळे इतर मार्जारांपेक्षा जास्त विकसित असतात.
[संपादन] संदर्भ व नोंदी
- ↑ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आ.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this species is vulnerable
- ↑ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिअन अॅनिमल्स. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- ढगाळ बिबट्या १ बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
- ढगाळ बिबट्या २ बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
- ढगाळ बिबट्या ३ बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |