ज्योर्दानो ब्रुनो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ज्योर्दानो ब्रुनो Giordano Bruno (इटालियन) |
|
|---|---|
| जन्म | इ.स. १५४८ नोला, नेपल्सचे राजतंत्र (आजचा इटली) |
| मृत्यू | १७ फेब्रुवारी, इ.स. १६०० रोम |
| नागरिकत्व | इटालियन |
| कारकिर्दीचा काळ | रानिसां |
ज्योर्दानो ब्रुनो (इटालियन: Giordano Bruno) (इ.स. १५४८ - १७ फेब्रुवारी, इ.स. १६००) हा रानिसां काळातील एक इटलियन तत्वज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. निकोलस कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यमालेच्या सिद्धांताच्या एक पाउल पुढे जाउन ब्रुनोने सूर्य हा एक तारा आहे अशी कल्पना प्रथम जगापुढे मांडली.
इ.स. १६०० साली कॅथलिक चर्च, येशू ख्रिस्त व ट्रिनिटीबाबत चुकीची मते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यावरून त्याला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. १७ फेब्रुवारी १६०० रोजी ब्रुनोला जिवंत जाळून टाकण्यात आले.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ब्रुनोच्या निर्मिती. (इंग्लिश मजकूर)
- ब्रुनोचे लिखाण. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |