जेकब झुमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेकब झुमा (जन्म: १२ एप्रिल १९४२) हे  दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका  देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. झुमा ह्यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने एप्रिल २००९ मधील राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. झुमा हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच दक्षिण आफ्रिकेचे पुर्व उपराष्ट्राध्यक्ष (१९९९ - २००५) आहेत.

२००५ साली बलात्कार केल्याच्या आरोपावरुन झुमा ह्यांच्यावर खटला भरण्यात आला होता, पण नंतर त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करण्याबद्दल अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

झुमा ह्यांनी आजवर ४ लग्ने केली असून त्यांना एकुण १८ अपत्ये असल्याचे वृत्त आहे.