ग्रेप वाईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाईन म्हणजे काय ?Coloured text

जसे दुधापासून दही तयार करताना आपण त्यात विरजण टाकल्यावर आंबवण्याची (Fermentation) क्रिया चालू होऊन त्याचे दही बनते अगदी तसेच वाईन द्राक्षाच्या रसामध्ये विशिष्ट प्रकारचे यीस्ट टाकल्यावर आंबवण्याची अथवा किण्वन प्रक्रिया ( नियंत्रित तापमानात) चालू होऊन द्राक्ष रसातील साखरेचे इथिल अल्कोहोल ( Ethanol ) व कार्बन - डाय- ऑक्साईड ( CO 2 ) मध्ये रुपांतर झाले की आम्ही म्हणतो वाईन तयार झाली.


द्राक्ष वाईन हे मद्य आहे कि नाहि ?

दारु म्हणजे असे मद्य की ज्यात ४० ते ४५ टक्के अल्कोहोल आहे. द्राक्ष वाईनच्या बाबतीत हे संभवत नाही. कारण द्राक्षाच्या वाईनमध्ये अल्कोहोल ११ ते १३ टक्के असते आणि वाईन अत्यंत माफ़क प्रमाणातच घेण्याचा प्रघात आहे.. वाईन माफ़क प्रमाणात घेतल्यास माणूस स्वत:ची शुद्ध घालवत नाहि आणि तो व्यसनी सुद्धा बनत नाहि.जर द्राक्ष वाईनच्या सेवनाने माणसे व्यसनाधिन होत असति तर वाईन संस्कृति असलेले देश निकामि बनले असते किंवा वेळीच तेथील सरकारांनी वाईनला प्रतिबंध केला असता .


वाईनचा दरडोई खप :

फ़्रान्स - ६० लि. दरडोई प्रतिवर्ष इटली - ५९ लि. दरडोई प्रतिवर्ष स्पेन - ३७ लि. दरडोई प्रतिवर्ष युनायटेड किंगडम - २४ लि. दरडोई प्रतिवर्ष चीन - ३५० मिलि दरडोई प्रतिवर्ष भारत - ०७ मिलि दरडोई प्रतिवर्ष


वरील महितीवरुन भारतामध्ये वाईनचा खप वाढण्यास प्रचंड वाव आहे हे दिसून येईल.

भारताची भरभराटिस येणारी अर्थव्यवस्था,प्रगतिच्या दिशेने वाटचाल करणारा मध्यमवर्ग आणि जागतिकीकरणाचा प्रचंड वेग पाहता भारतातील वाईन सेवन झपाटयाने वाढत आहे.


धन्यवाद !