कुऱ्हाड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कुऱ्हाड (इंग्लिश: Axe, अॅक्स ;) हे मानवी इतिहासात अनेक सहस्रकांपासून झाडे/लाकूड तोडण्यासाठी वापरले जाणारे एक अवजार, तसेच एक शस्त्र आहे. याचा विशेष समारंभांमध्ये, तसेच मानचिन्हांमध्ये मानाचे प्रतीक म्हणूनदेखील कुऱ्हाड मिरवली जाते. संरचनेनुसार कुऱ्हाडीचे अनेक प्रकार आढळतात; मात्र सहसा सर्व कुऱ्हाडींना हातांत धरायला एक लांब दांडा व त्याच्या अग्राला लावलेले धातूचे पाते असते. हिच्या वापराच्या रीतीतही सर्वत्र समानता आढळते; जिच्यात दोन्ही हातांनी दांडा धरून, खांद्यांतून हात झोकून लक्ष्यावर कुऱ्हाडीच्या पात्याचा वार केला जातो.
कुऱ्हाडीस ऋग्वेदात वाशी असे म्हटले आहे.[१]
संदर्भ [संपादन]
- ↑ [ॠग्वेद, ॠचा क्रमांक ८.२९.३]
हेही पाहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अमेरिकन वानिकी खात्याच्या संकेतस्थळावरील कुऱ्हाडीचे वापरपुस्तिका (इंग्लिश मजकूर)