ओपेक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांची संघटना Organization of the Petroleum Exporting Countries |
|
|---|---|
| लघुरूप | ओपेक (OPEC) |
| स्थापना | सप्टेंबर १०, १९६० |
| मुख्यालय | व्हियेना, ऑस्ट्रिया |
| सदस्यता | |
| अधिकृत भाषा | इंग्लिश[१] |
| वेबसाईट | www.opec.org |
पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांची संघटना किंवा ओपेक (इंग्लिश: Organization of the Petroleum Exporting Countries) हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणार्या देशांचा उत्पादक संघ (कार्टेल) आहे. अल्जीरिया, अँगोला, इक्वेडोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत. १९६५ सालापासून ओपेकचे मुख्यालय व्हियेना येथे स्थित आहे. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते.
संदर्भ [संपादन]
- ↑ Chapter I, Article 6 of The Statute of the organization of the Petroleum Exporting Countries (as amended)
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||