ओडिसी नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नन्दिनि घोषाल ओडिसी नृत्य करताना

ओडिसी नृत्य ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचा विशेष होय.‘त्रिभंग’ स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओडिशा मधिल उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. केलुचरण महापात्र, संयुक्ता पाणिग्रही, सोनल मानसिंग, माधवी मुडगल, किरण सैगल हे आघाडीचे ओडिसी नर्तक होत. ओडिसीच्या सध्याच्या स्वरूपात बाराव्या शतकात जयदेवाने लिहिलेल्या गीतगोविंदाची पदे प्रामुख्याने वापरली जातात.

अनुक्रमणिका

[संपादन] परिचय

जैनराजा करवेलाच्या कारकिर्दित ओडिसी नृत्यशैलीचा जन्म झाला. तो स्वतः उत्कृष्ट नर्तक होता. ही शैली इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात विकसित झाली. ओडिसी हे तीन प्रकारच्या नर्तकांद्वारे केले जाई.

  • महारी (जगन्नाथ मंदिरातील दासी)
  • गोटिपुवा (स्त्रीरूपधारी कुमार मुले)
  • नर्तकी (राजदरबारातील सेवेकरी नर्तकी)

[संपादन] अवतरण शैली

अनुश्री मुद्गल यांची एक मुद्रा

नाट्यशास्त्रातील‍ दाक्षिणात्य, पाञ्चालि, औड्रमागधि, अवंती अशा चार प्रकार आहेत. महेश्वरपत्र रचित अभिनयचंद्रिका ग्रंथात ‍ ओडिसी नृत्य औड्रमागधि शैलीचे अनुकरण करते असे म्हटले आहे. जंब, ध्रुवा, माता, रूपक, त्रिपुट, अट, एकतालि, अटतालि, आदिताल असे नऊ ताल ओडिसीत वापरले जातात. त्रिभंगी मुद्रा व हे ताल वापरून ओडिसीमध्ये वैविध्यपूर्ण रसभाव, चारिकळा, मण्डल तयार केळी जातात. लास्य (सौम्य) ताण्डव ( उग्र) भेदात ओडिसी नृत्याची प्रकृती ताण्डवाकडे झुकली आहे. या नृत्यात शंकर, जगन्नाथ काली, गणपती आदी देवतांची स्तुती उपासना केली जाते.

[संपादन] विविध अंग

मंगलाचरण, स्थायी, पल्लवी, अभिनय, मोक्ष हे ओडिसीचे प्रमुख पाच अंगे आहेत.

[संपादन] मंगलाचरण (नृत्याञ्जलि)

मंगलाचरण

“मंगळाचरणं“ करण्याचा उद्देश म्हणजे भूमिप्रणाम, देवस्तुती, शब्दप्रणाम. अशा तीन कारणाने करतात. नटराजाच्या आवाहनाने नृत्याचा प्रारंभ होतो.

[संपादन] पल्लवी

पल्लवीचे वाद्यपल्लवी, स्वरपल्लवी असे दोन प्रकार आहेत.[१] भरतनाट्यम मधिल तिल्लाणाशी पल्लवीचे साम्य आहे.

[संपादन] अभिनय

अभिनय हा ओडिसी शैलीतील सर्वाधिक मनोहर भाग असतो. यात रसाभिनय, हस्ताभिनय आदी भाग आहेत.

[संपादन] मोक्ष

नृत्याचा हा परमोच्च बिंदू. येथे नर्तक आत्म्याचे परमात्याशी मिलन झाल्याचे परमोच्च भाव प्रकट करतो.

[संपादन] चित्रसज्जा

[संपादन] संदर्भ

  1. विजयभानु रचित “नृत्यप्रकाशिक”

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे
अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये