भरतनाट्यम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भरतनाट्यम ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे.
या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटक संगिताच्या साथीने होते. अलरिपु, वर्णम, पदम, तिल्लाणा ही भरतनाट्यमची विविध अंगे आहेत.
[संपादन] नाव
भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुस-या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर (Sadir) या नावानेही ओळखले जाई.
[संपादन] श्रेष्ठ कलाकार
भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे सध्याचे स्वरूप तंजावर येथे विकसित झाले आहे. टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी देवी आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे.
[संपादन] भरतनाट्यमच्या विविध मुद्रा
|
|
|---|
| यात खालील ८ प्रकारांचा समावेश आहे |
| भरतनाट्यम | कथक | कथकली | कुचिपुडी | मणिपुरी | मोहिनीअट्ट्म | ओडिसी नृत्य | सत्तरी नृत्य |

