ऑस्कर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्कर पुरस्कार
Current awards ८३ वा ऑस्कर पुरस्कार
Academy award vinto da maximilian schell come miglior attore protagonista, 1961.JPG
पुरस्काराचे प्रयोजन चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी
प्रस्तुतकर्ता चलत चित्र कला व विज्ञान अकादमी
देश अमेरिका
प्रथम पुरस्कार मे १६, इ.स. १९२९
अधिकृत संकेतस्थळ

ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार (इंग्लिश: Academy Awards) हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.

अनुक्रमणिका

[संपादन] आरंभ

पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा मे १६, इ.स. १९२९ रोजी हॉलिवुड रुझवेल्ट हॉटेलमध्ये अंदाजे २७० जणांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्याला पाच डॉलर तिकिटाचा दर होता. इ.स. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. इ.स. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो.

[संपादन] पद्धती

पहिल्या सोहळ्यात ऑस्कर विजेत्यांची नावे सोहळ्याच्या तीन महिने आधीच जाहीर केली गेली होती. मात्र, पुढील वर्षापासून विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यापर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. सोहळ्याच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि सोहळ्याच्या दिवशी रात्री ११ वाजता ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत इ.स. १९४० पर्यंत पाळली गेली. परंतु लॉस एंजेलिस टाइम्सने ऑस्कर विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना ती सहज उपलब्ध झाली. या मुले पद्धत बदलणे भाग झाले. इ.स १९४१ पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली.

[संपादन] प्रथम पुरस्कार

पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते. सवोर्त्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सवोर्त्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना मिळाले दिले गेले होते.

[संपादन] प्रथम विशेष पुरस्कार

पहिल्या ऑस्कर सोहळ्यात दोन विशेष ऑस्कर पुरस्कार दिले गेले.

[संपादन] सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे अभिनेते

[संपादन] पुरुष

  • जॅक निकल्सन यांना अभिनयासाठी १२ वेळा नामांकने मिळाली आहेत. त्यातील वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट इ.स. १९७५ आणि अॅझ गुड अॅझ इट गेट्स इ.स. १९९७ चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचे तर टर्म्स ऑफ एडियरमेंट इ.स. १९८३ साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले. अभिनयातले तीन ऑस्कर मिळवणारा हा एकमेव अभिनेता आहे.

[संपादन] महिला

  • केथरिन हेपबर्न उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वाधिक चार ऑस्कर मिळवण्याचा विक्रम यांच्या नावावर आहे. ५० वर्षांच्या कारकीदीर्त त्यांना १२ वेळा नामांकने मिळाली आहेत. त्यात मॉनिर्ग ग्लोरी इ.स. १९३२, गेस हू इज कमिंग टू डिनर इ.स. १९६७, द लायन इन विंटर इ.स. १९६८ आणि ऑन गोल्डन पाँड इ.स. १९८१ या चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

[संपादन] संकीर्ण

मराठी वेशभूषाकार भानू अथय्या यांना इ.स. १९८२ मध्ये गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनासाठी जॉन मोल्लो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभागून मिळाला होता.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये