हरभरा
हरभरा किंवा हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असे म्हणतात.
याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३० किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करून देतो. हरभऱ्यापासून डाळ, बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकुर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते. हरभऱ्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.
लागवड
[संपादन]जमीनीचा प्रकार हलकी, मध्यम व भारी जमीनपूर्व मशागत नांगरणी व वखराची पाळीपेरणीची वेळ १५ आँक्टोबर ते नोव्हेंबर पहिला आठवडा. वाण बीडीएन ९-३, फूले जी -५, फुले जी -१२ आयसीसीव्हि -२, फूले जी-५ -८१ -१-१ चाफा, जी -१२, आयसीसीव्ही -१० विकास जी-१, विश्वास (जी -५), विशाल (फुले -जी -८७ -२०७) लागणारे बियाणे ७० ते १०० किलो प्रति हेक्टरीहेक्टरी रोप संख्या ३. ३३ लाखबीजप्रक्रिया पेरणी पूर्वी रायझॊबियम व जिवाणू स्फुरद संवर्धक वापरावे . पेरणीचे अंतर ३० x १० सेंमी. आंतर मशागत १ -२ खुरपण्यापीक पद्धती विशेष माहिती २ पाण्याच्या पाळ्या -१ पेरणी नंतर ४५ दिवासांनी व दुसरी ७५ दिवासाने दिल्यास उत्पादनात वाढ होते. कीड / रोग घाटे अळी, मर, मूळ कुजव्यापिकांची फेरपालट ज्वारी / गहू / बाजरी - हरभरा मका / ज्वारी.
वाण
[संपादन]- विजय
- दिग्विजय
- पी के व्ही हरित
- जाकी ९२
इतर भाषेतील नावे
[संपादन]- इंग्लिश भाषा: Bengal Gram, Chickpea,
- आसामी: বুট बुट्टा
- बंगाली: চণক चनका,
- गुजराती: ચણક चणो
- हिंदी भाषा: बटुरी, बूँट, चना, छोला
- कन्नड: ಕೀಸರಿಬೇಳೆ किसारीबेले
- काश्मिरी: चन
- मल्याळम: ബംഗാള് കടല बंगाला काताला
- नेपाळी: चना
- उडिया: चोना
- फारसी: نخود नुखुड
- पंजाबी: ਬੂਟ बुट
- संस्कृत: चणकः
- तमिळ: கடலை कतलाई
- तेलुगू: చణకము कनकामु
- उर्दू: نخود नुखुड